आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Of India Pranab Mukherjee Delivering Speech On Republic Day

संघर्षाचे कारण धर्म ठरू नये, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्‍ट्रपतींचे अभिभाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात धर्म हा संघर्षाचे कारण ठरू नये. धर्माचा उपयोग एकतेसाठी व्हायला हवा. हेच आपल्या देशाचे तत्वज्ञान शिकवते, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मार्गदर्शन करताना मुखर्जी बोलत होते.
६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुखर्जी यांनी महात्मा गांधी धर्मविषयक विचारांचे स्मरण केले. धर्म ही एकतेसाठी असलेली ताकद बनावी. एकजूट हीच खरी शक्ती असते. यातूनच आपण कमकुवत गोष्टींवर विजय मिळवू शकतो.
राज्यघटना हा लोकशाहीचा पवित्र ग्रंथ आहे. विविध धर्मियांविषयी सहिष्णूता, बंधुत्वाची भावना हेच भारतीयात्वाचे लक्षण आहे. ही मूल्ये सर्वांनी जोपासली पाहिजे. देशात ‘घर वापसी’ सारख्या कार्यक्रमावरून धार्मिक वादंग निर्माण झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी हा संवेदनशील मुद्दा उपस्थित करून देशाच्या एकतेचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. देशाची ओळख सॉफ्ट पॉवर म्हणून झाली आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देश भारतासोबत मैत्रीचा हात पुढे करू लागले आहेत. त्यामागे आपला अहिंसा, समतेवरील विश्वास आहे. आपल्या देशात कायद्या एवढेच विश्वासाला महत्व आहे. हीच सांस्कृतिक मूल्ये एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
परराष्ट्र धोरणावर
भारताच्या परराष्ट्र धोरणात शांती, अहिंसा आणि चांगला शेजारी म्हणून वागणे ही मूल्ये आहेत. ही मूल्ये परराष्ट्र धोरणाचा पाया आहेत. परंतु दुर्देवाने सीमेवर सातत्याने दहशतवाद आणि हिंसाचार सुरू आहे. परंतु देशाची प्रगती, समृद्धीमध्ये अडसर ठरणाऱ्या अशा तत्वांना आम्ही कदापि मान्य करणार नाहीत, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.