आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee Donate His One Month Salary For Uttarakhand

राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जींनी दिले एक महिन्‍याचे वेतन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी पुरामुळे उद्धवस्‍त झालेल्‍या उत्तराखंड पीडितांच्‍या मदतीसाठी आपले एक महिन्‍याचे वेतन देणार आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, रविवारी राष्‍ट्रपतींनी संबंधित विभागाला त्‍यांचे या महिन्‍याचे वेतन उत्तराखंड मुख्‍यमंत्री निधीत जमा करण्‍यास सांगितले आहे. राष्‍ट्रपतींना मासिक वेतन दीड लाख रूपये इतके आहे.

केदारनाथमध्‍ये ढगफुटी आणि पुरामुळे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असून हजारो लोक तिथे अजूनही फसलेले आहेत. या दुर्दैवी घटनेत एक हजारापेक्षा जास्‍त लोक मृत्‍यूमुखी पडल्‍याचे उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री विजय बहुगुणा यांनी सांगितले आहे.

उत्तराखंडातील या दुघर्टनेमुळे राष्‍ट्रपतींनी हिमाचल प्रदेशमधील आपली वार्षिक यात्रा पूर्वीच रद्द केली आहे. येत्‍या 28 जून ते एक जुलैदरम्‍यान राष्‍ट्रपती सिमलाला जाणार होते.