आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee For Debate And Discussion, Not Disruption

राष्ट्रपती मुखर्जी यांच्या अभिभाषणात जुन्याच घाेषणांची झाली उजळणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मंगळवारी प्रारंभ झाला. तब्बल एक तास दहा मिनिटांच्या त्यांच्या भाषणात सरकारने राबवलेल्या अनेक महत्त्वाच्या घाेषणा आणि कामांचा उल्लेख करण्यात अाला. मात्र, त्यात बहुतांश विषय हे उजळणीचेच ठरले.

२०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, वन रँक वन पेन्शन, जन धन योजना, २०२२ पर्यंत सर्वांना घरे,पीक विमा याेजना, स्वच्छ भारत अभियान, शाैचालयांची निर्मिती, गाव तिथे रस्ता या विषयांकडे लक्ष वेधण्यात अाले. मात्र,हे विषय जुनेच हाेते. राष्ट्रपती ज्यावेळी सरकारच्या घाेषणा आणि सुरू असलेले कार्य याबाबत माहिती देत हाेते तेव्हा सत्ताधारी पक्षांचे सदस्य बाके वाजवत होते. ज्या मंत्रालयाच्या कामाला उजाळा दिला जात हाेता तेव्हा कॅमेरे संबंधित मंत्र्यांना लक्ष्य करीत हाेते. अभिभाषण सुरू व्हायच्या आधी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेच्या प्रांगणात पत्रकारांशी बाेलताना यावेळी विराेधी पक्षाची भूमिका सकारात्मक राहील आणि दाेन्ही सभागृहांत लाेकांच्या अपेक्षेनुसार चर्चा हाेईल, असा विश्वास व्यक्त केला.

मात्र, संसदेचे हे अधिवेशन सरकारला खूप साेपे नाही असे एकूण चित्र दिसत अाहे. हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी राेहित वेमुला याची अात्महत्या, जेएनयू विद्यापीठातील अद्यापही धगधगणारे प्रकरण, हरियाणामधील जाट समुदायाचे अारक्षणासाठी अांदाेलन, विराेधकांचे जंतरमंतरवर धरणे यामुळे तणावाचे वातावरण अाहे. त्याची धग संसदेेत दिसून येईल. विराेधक त्यादृष्टीने तयार अाहेत, असे चित्र आहे.