आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी इस्रायल, पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या वर्षी आॅक्टोबरमध्ये इस्रायल व पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या देशांचा दाैरा करणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती जॉर्डनलाही भेट देतील, अशी शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पॅलेस्टाइन व जॉर्डनचा समावेश करून आपला कल केवळ इस्रायलच्या बाजूनेच आहे हे असे दाखवून न देण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे म्हटले जात आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जूनमध्ये पंतप्रधान मोदी यावर्षी इस्रायल, पॅलेस्टाइन व जाॅर्डनला भेट देतील असे संकेत दिले होेते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल दौऱ्याचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व एनडीए सरकारच्या अन्य सल्लागारांकडून आला आहे. यानुसार इस्रायलला भारताचा मित्र म्हणून घोषित करण्याची गरज आहे, परंतु सरकार पॅलेस्टाइनचादेखील दौरा जाहीर करून त्यात संतुलन ठेवू इच्छिते. याआधी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वाजपेयी मंत्रिमंडळात गृहमंत्री असताना तर त्यांच्यानंतर जसवंत सिंह, यूपीएच्या काळात एस. एम. कृष्णा यांनीही इस्रायल दौरा केला होता. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही इस्रायल दौरा केला होता.
बातम्या आणखी आहेत...