आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee Pitches For More Healthcare Budget

ब्रिक्स देशांमध्ये भारत खूप पिछाडीवर असल्याने चिंता - राष्ट्रपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात जगातील आठ टक्के लोकसंख्या राहते. म्हणूनच देशातील आरोग्य खर्चावर तत्काळ वाढ करण्याची गरज आहे. वास्तविक सध्या होणारा खर्च अतिशय कमी आहे. आरोग्यासाठी दरडोई होणारा सरकारी खर्च केवळ २ हजार ७५० रुपये आहे. त्यामुळे वाढ करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुखर्जी यांनी शनिवारी सरकारचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले. भारतासारख्या विकसनशील देशाला अतिशय चांगल्या आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. प्रत्येकाला या व्यवस्थेपर्यंत सहज पोहोचता यायला हवे. त्यानुसार ही यंत्रणा स्वस्त आणि प्रभावी असली पाहिजे.

पायाभूत सुविधा मजबूत आणि दर्जेदार हवी

राष्ट्रीय आरोग्य मिशनमुळे आरोग्य सेवेत सुधारणा झाली आहे. परंतु अजूनही कोट्यवधी लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचू शकलेली नाही. त्यात गुणवत्तेचा अभाव आहे. दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. देशात चांगली सेवा दिली गेली पाहिजे. सध्या सुमारे १७ टक्के अर्थात २१ कोटी ६० लाख लोकांकडे आरोग्य विमा आहे.
- भारतात जीडीपीतून १.२ टक्के होतात आरोग्यावर खर्च, चीनमध्ये ३ टक्के, अमेरिकेत ८.३ टक्के.
- १२ व्या पंचवार्षिक योजनेत २०१७ पर्यंत जीडीपीच्या २.५ टक्क्यापर्यंत खर्चाचे उद्दिष्ट
- आरोग्य विभागाकडे २०१५-१६ मध्ये अर्थसंकल्पात ३३, १५२ कोटींची तरतूद