आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee Shares Wife\'s Photos

राष्ट्रपतींनी ट्विटरवर पोस्ट केले शुभ्रांचे PHOTOS, नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे काल निधन झाले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवरुन शुभ्रा यांचे काही निवडक फोटो शेअर करण्यात आले. यात प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती ज्ञानी जैसलिंग आदी नेते दिसतात. काही फोटो राष्ट्रपती आणि शुभ्रा यांचे आहेत.
श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले नेतेमंडळी
शुभ्रा यांना श्रद्धांजली देण्यासाठी नेतेमंडळी राष्ट्रपती भवनात गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हामिद अंसारी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते आनंद शर्मा आदी नेते यावेळी आले होते.
शेख हसिना येणार
शुभ्रा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आज भारतात येणार आहेत. प्रणव मुखर्जी आणि शेख हसिना यांच्या कुटुंबीयांमध्ये घरगुती संबंध आहेत. शुभ्रा आणि हसिना चांगल्या मैत्रिणी होत्या.
पुढील स्लाईडवर बघा, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवर शेअर केलेले शुभ्रा यांचे फोटो....