आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रपतींच्‍या पत्‍नी शुभ्रा मुखर्जींचे निधन; नऊ दिवसांपासून होत्‍या रुग्‍णालयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुभ्रा मुखर्जी - Divya Marathi
शुभ्रा मुखर्जी

नवी दिल्‍ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे आज सकाळी सैन्य रुग्‍णालयात (रिसर्च एंड रेफरल) 10.51 वाजता निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर अती दक्षता विभागामध्‍ये (आसीयू) 8 ऑगस्‍टपासून उपचार सुरू होते, त्‍यांच्‍या निधनाबाबत राष्ट्रपती भवनच्‍या ट्विटर हँडल @RashtrapatiBhvn वर माहिती देण्‍यात आली आली आहे.

प्रणव मुखर्जी यांना 58 वर्षे दिली साथ
शुभ्रा मुखर्जी यांचा जन्म बांग्लादेशाच्‍या नरैलमध्‍ये झाला. त्‍या दहा वर्षांच्‍या असताना त्‍यांचे कुटुंब कोलकत्‍त्‍यात आले आणि तेथेच स्‍थायिक झाले. 58 वर्षांपूर्वी 13 जुलै 1957 त्‍यांचे लग्‍न झाले.
राजकारणापासून ठेवले स्‍वत:ला दूर
त्‍यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्‍यांचा मोठा मुलगा अभिजित हा बंगालमध्‍ये काँग्रेसचे खासदार आहे तर मुलगी कथक नृत्यांगना आहे. जेव्‍हा प्रवण मुखर्जी राष्‍ट्रपती झाले तेव्‍हा त्‍यांनी सांगितले होते, ''मला राजकारणापेक्षा बागकामात आवड आहे.'' त्‍यामुळेच राष्‍ट्रपती भवनातील बागेची त्‍या स्‍वत: देखरेख करत होत्‍या.
राष्‍ट्रपती तातडीने दिल्‍लीत दाखल
शुभ्रा यांच्‍या निधनाची माहिती मिळताच ओडिशा दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती तातडीने दौरा अर्धवट सोडून दिल्लीत दाखल झाले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा शुभ्रा यांचे प्रणव मुखर्जी यांच्‍या सोबतचे दुर्मिळ फोटोज...