आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिकॉन व्हॅलीला आज मुखर्जींची भेट, स्टार्टअप इंडियाची शनिवारी रोवणार मुहूर्तमेढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी सिलिकॉन व्हॅलीतील अग्रणी मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि उद्यम भांडवलदारांशी संवाद साधणार आहेत. भारताने संशोधन, डिझाइन आणि स्टार्ट अपला चालना देण्यासाठी धोरण आखल्याने त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ‘स्टार्ट अप इंडिया’ योजनेची घोषणा करणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार्ट अप योजनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल. नव उद्योजकांना यातून प्रेरणा मिळेल, असे राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील सिलिकॉन व्हॅली प्रदेशात जगातील अग्रणी तंत्रज्ञान कंपन्या आहेत.

उद्योजकांची उपस्थिती: व्यंकटेश शुक्ला (अध्यक्ष-टीआय), सुहास पाटील ( सीईआे-क्रॅडल टेक्नॉलॉजीज), कृष्णा यारलागड्डा (इमॅजिनेशन टेक्नॉलॉजी), अदील अदी (वर्ल्ड लिंक), अॅडम नेउमन (वुईवर्क), सर्वाजन द्विवेदी (पर्ल थेराप्युटिक्स), कंवल रेखी (इन्व्हेंट्स कॅपिटल). या उद्योजकांचे भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलेे. स्टार्ट अप कंपन्यांना चालना आणि संशोधन क्षेत्रात विकासासाठी ही योजना सुरू होईल.