आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranav Mukharji Commented On Puraskar Vapasi In Delhi

मतभेदांवर चर्चा करा; पुरस्कार वापसी नकाे, राष्ट्रपतींचे अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विज्ञान भवन येथे आयोजित कार्टून-कॅरिकेचर्स प्रदर्शनात आपल्यावरील व्यंगचित्रे पाहताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना हसू आवरले नाही... - Divya Marathi
विज्ञान भवन येथे आयोजित कार्टून-कॅरिकेचर्स प्रदर्शनात आपल्यावरील व्यंगचित्रे पाहताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना हसू आवरले नाही...
नवी दिल्ली- देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, चित्रपट कलावंत आणि शास्त्रज्ञांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. पुरस्कार परत करू नका. मतभेद असतील तर चर्चा अथवा संवादातून व्यक्त व्हा, असे राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाले की, तर्कापेक्षा भावना कधीही वरचढ होऊ देऊ नये. काही मुद्द्यांवर तीव्र मतभेद किंवा असहमती असेल तर चर्चा अथवा वादविवादातून व्यक्त व्हा. राष्ट्रीय पुरस्कार हे तुमच्यातील कलागुण, प्रतिभा व योग्यतेला दिलेली पावती असते. तुमच्यातील बुद्धिमत्ता कला आणि गुणवत्तेला मिळालेली ती लोकमान्यता असते. त्यामुळे अशा पुरस्कारांचे महत्त्व ओळखून त्यांचा आदर करायला हवा. ते सरकारला परत करू नयेत.

समाजात काही घटना घडल्या तर त्यामुळे संवेदनशील व्यक्ती अस्वस्थ होतात. तसे होणे अतिशय साहजिकही आहे. परंतु एक जबाबदार आणि गौरवशाली भारतीय नागरिक या नात्याने आपल्या राज्यघटनेतील तत्त्वे व मूल्यांवर आपला विश्वास हवा. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्या स्थितीतून बाहेर पडण्यास देश समर्थ राहिला आहे, असेही मुखर्जी म्हणाले.

भावना तर्कापेक्षा कधीही वरचढ होऊ देऊ नका
स्मोक करेपर्यंत खूप कार्टून आले :
प्रेस कौन्सिलने आर. के. लक्ष्मण व राजेंद्र पुरींच्या स्मरणार्थ कार्टून व कॅरिकेचरवर परिसंवाद ठेवला होता. राष्ट्रपती म्हणाले,‘ मी अनेक दशके कार्टून व कॅरिकेचर्सचे पात्र राहिलो. धूम्रपान करत होतो तोवर मला ओळखले जाऊ शकत होते. ‘मला सोडू नका शंकर’ असे पंडित नेहरू कार्टूनिस्टचे अध्वर्यू व्ही. शंकर यांना म्हणत असत. कार्टूनवर चर्चेसाठी ते त्यांच्या घरी जात. प्रामाणिक टीकेचा खुल्या मनाने स्वीकार आणि प्रशंसा ही आपली महान परंपरा राहिली आहे. ती टिकवण्याची नितांत गरज आहे.’

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी कोण काय म्हणाले...