आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती कोविंद यांचे पहिले संबोधन, देशावासियांना सांगितला \'न्यु इंडिया\'चा खरा अर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले. आपल्या पहिल्या संबोधनात त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कौतुक करताना देशवासियांना न्यु इंडियाचा खरा अर्थ सांगितला आहे. यासोबतच त्यांनी गावातील बालपणीच्या आठवणी काढताना सर्वांना संवेदनशील समाज निर्मितीचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यासाठी दिग्गज नेते, क्रांतीकारी आणि समाज सुधारकांची नावे जाहीर करताना पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कामगिरीचा देखील उल्लेख केला आहे. 
 
 
2022 पर्यंत न्यु इंडियाचे लक्ष्य
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्या राष्ट्रीय संबोधनात देशवासियांना न्यु इंडियाचा खरा अर्थ सांगितला आहे. प्रत्येक देशवासियाने 2022 पर्यंत न्यु इंडियाचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 
- प्रत्येकाला आपले स्वतःचे घर, चांगले रस्ते, रेल्वे मार्ग आणि भविष्याच्या दिशेने झपाट्याने जाणारा संवेदनशील समाज म्हणजे न्यु इंडिया होय.
- सर्वांची गळाभेट घेणारा, मानवता मूल्य जपणारा, सर्वांना समान वागणूक देणारा, गरीबांना मदत करणारा आणि सर्वांना गर्व होईल असा आदर्श समाज म्हणजेच माझा न्यु इंडिया...
- असा समाज जेथे सर्वांना आरोग्य सुविधा मिळतील, प्रत्येकाला आपल्या क्षमता विकसित करता येतील प्रत्येकाच्या कामाला वाव असेल तोच न्यु इंडिया...
बातम्या आणखी आहेत...