आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दहशतवादविरोधी विधेयक परत पाठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुजरात विधानसभेने पारित केलेले वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अतिरिक्त माहितीची पूर्तता करण्याची सूचना करत परत पाठवले आहे. याआधीच्या संपुआ सरकारने विधेयक दोनदा परत पाठवले होते.

गुजरात दहशतवाद नियंत्रण आणि संघटित गुन्हेगारी विधेयक २०१५ (गुजकोका) मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अधांतरीच अाहे. तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी २००३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत विधेयक मांडले होते. तत्कालीन राष्ट्रपतींनी विधेयकात अतिरिक्त माहितीची मागणी करत ते गृह मंत्रालयाकडे परत पाठवले. यानंतर गृह मंत्रालय गुजरात सरकारकडून माहिती घेऊन राष्ट्रपतींना सादर करेल, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.