Home »National »Delhi» Presidential Candidate Kovind Cmplete Profile

भाजपचे प्रवक्ते असूनही कधीच TV वर झळकले नाहीत: असे आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोविंद

दिव्य मराठी वेब टीम | Jun 20, 2017, 07:41 AM IST

नवी दिल्ली -एनडीएने राष्ट्रपतिपदासाठी आपले उमेदवार म्हणून अधिकृतरीत्या रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. कोविंद यांचे राष्ट्रपती होणे जवळपास निश्चित आहे. कोविंद यांचे नाव विरोधकांसाठी आश्चर्याचा धक्का मानले जात आहे. यापूर्वी जेव्हा त्यांना बिहारचे राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले, त्यावेळी बिहारचे सीएम नितीश कुमार यांनाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. कोविंद भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय प्रवक्ते असतानाही ते कधीच टीव्हीवर झळकले नाहीत. त्यांना वादात अडकून राहणे मुळीच पसंत नाही. कोविंद यांना यूपीत दलित चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी राजनाथ सिंह यांनी तयारी सुद्धा केली होती.
1#जन्म
- 1 ऑक्टोबर 1945 रोजी कानपूरच्या डेरापूर येथील पराँख गावात त्यांचा जन्म झाला. सविता कोविंद विवाहित असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
2# सुप्रीम कोर्ट-हाईकोर्ट
- 1978 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात वकीली केली. 1980 ते 1993 पर्यंत ते सुप्रीम कोर्टात केंद्राच्या स्थायी समितीमध्ये सुद्धा होते. 1971 मध्ये दिल्ली बार काउंसिलमध्ये ते अॅडव्होकेट राहिले आहेत. 1977 ते 1979 दरम्यान दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा...

Next Article

Recommended