Home »National »Delhi» Presidential Poll Candidates Bjp Congress News And Updates

2019 जिंकण्यासाठी बिहारमध्ये मोदींनी शाेधलेे यूपीचे ‘राम’नाथ, कोविंद यांचा विजय निश्चित

दिव्य मराठी वेब टीम | Jun 20, 2017, 02:59 AM IST

नवी दिल्ली -नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडगोळीने पुन्हा एकदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवताना त्यांनी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सोमवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीआधी शहा यांनी कोविंद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बैठक संपल्यानंतर मोदींनी कोविंद यांचे उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. विराेधातील काही पक्षांच्या पाठिंब्याने रालोआकडे आवश्यकतेपेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे दलित नेते कोविंद यांची निवड निश्चित मानली जाते. के. आर. नारायणन पहिले दलित राष्ट्रपती होते. अाता कोविंद यांना दुसरा मान मिळू शकताे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती उत्तर प्रदेशातून होण्याची ही पहिली वेळ असेल. दरम्यान, यूपीए गुरुवारी उमेदवारीबाबत निर्णय घेणार अाहे.
भाजपचा पहिला राष्ट्रपती, मोदींना महत्त्वाच्या मुद्द्यांवर मिळेल साथ
लोकसभेत बहुमत, १७ राज्यांत भाजप सरकार, अाता राष्ट्रपतीही. त्यामुळे मोठे निर्णय शक्य...
- भूसंपादन दुरुस्ती विधेयक पुन्हा आणले. तीनदा अध्यादेश आणल्याने ते रद्द करावे लागले होते.
- लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र करण्यासाठी पाऊल उचलणे.
- निवडणुकांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पक्ष व सरकार याच्या अंमलबजावणीसाठी नवा कायदा आणू शकते.
सत्तरीनंतर विश्रांती; मात्र काेविंद ७१चे
- राजकारणातून सत्तरीनंतर विश्रांतीचे भाजपचे धाेरण, मात्र काेविंद यांचे वय ७१.
- जन्म : १ अाॅक्टाेबर १९४५ राेजी पराेख (जि. कानपूर).
- नागरी सेवेत तिसऱ्या वेळी यश. मात्र संलग्न सेवा मिळाल्याने नाेकरीस नकार.
- हायकाेर्ट, सुप्रीम काेर्टात वकिली. दाेनदा खासदार.
- १९७७ मध्ये पंतप्रधान माेरारजी यांचे अाेएसडी.
पुढील स्लाइडवर वाचा,
> राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा
> 13 टक्के मते ठरवणार कोण होईल घटनात्मक प्रमुख
> कोविंद यांचा विजय निश्चित

Next Article

Recommended