आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Presidential Reference Send To Supreme Court For Investigation Of A.K.Gaguly Case

ए.के. गांगुली प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाला प्रेसिडेंशियल रेफरन्स पाठवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रशिक्षणार्थी महिला वकिलाच्या लैंगिक शोषण प्रकरणात सरकार निवृत्त न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांची चौकशी करण्यासाठी या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला प्रेसिडेंशियल रेफरन्स पाठवणार आहे. अ‍ॅटर्नी जनरल यांनी चौकशीसाठी होकार दर्शवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्या. गांगुली यांच्या असभ्य वागणुकीमुळे त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यायोग्य परिस्थिती असल्याचे अ‍ॅटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. गृह मंत्रालय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत वहानवटी यांची शिफारस मांडणे अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
यानंतर गृह मंत्रालय न्या. गांगुली यांच्याविरुद्ध नव्याने चौकशी करण्यासाठी राष्‍ट्रपतींना पाठवलेले पत्र सरन्यायाधीशांना पाठवेल. या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित मानले जाते.