आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • President's Rule In Delhi, Marathi News, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत राष्ट्रपती राजवट; नायब राज्यपालांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी अरविंद केजरीवाल सरकारची शिफारस फेटाळत दिल्लीत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपती राजवटीच्या प्रस्तावावर शनिवारी केंद्रीय कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले.आता त्यावर फक्त राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे बाकी आहे.

केजरीवाल यांनी शुक्रवारी राजीनामा देताना विधानसभा भंग करून तत्काळ निवडणुका घेण्याची शिफारस नायब राज्यपालांकडे केली होती. केजरीवाल यांचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. नायब राज्यपालांच्या शिफारशीवर केजरीवाल यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

तत्पूर्वी, केजरीवाल म्हणाले की, सरकारच्या शिफारशीनुसारच निर्णय घ्यावा, असे घटनात्मक बंधन नायब राज्यपालांवर आहे. मात्र कुणाच्या दबावाखाली ते असे करायला नकार देत आहेत. दरम्यान, आगामी डावपेचांबाबत चर्चा करण्यासाठी ‘आप’च्या राजकीय समितीची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर संजय सिंह यांनी सांगितले की, केजरीवाल 23 फेब्रुवारीपासून रोहतकमधून राष्ट्रीय प्रचार मोहिमेचा प्रारंभ करतील. याआधी पक्ष ‘झाडू चलाओ बेईमान भगाओ’ मोहीम सुरू करेल. यात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपच्या छुप्या हातमिळवणीचा पर्दाफाश करण्यात येईल. ही मोहीम 25 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

लोकसभेसाठी ‘आप’च्या 2627 ‘झाडू चलाओ’ यात्रा
सत्तेतून पायउतार झाल्याच्या 24 तासांच्या आतच ‘आप’ने लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लोकसभा लढवणार असल्याची घोषणा ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांनी शनिवारी केली. पक्षाची पहिली मोहीम असेल ‘झाडू चलाओ यात्रा.’ याअंतर्गत येत्या 10 दिवसांत 24 राज्यांत 2627 यात्रा काढल्या जातील. 332 मतदारसंघांत पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत.