आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priests Gear Up To Resume Prayers At Flood ravaged Kedarnath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केदारनाथ मंदिरात पूजा सुरू करण्याच्या तयारीला वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तराखंडमधील जलप्रलयानंतर उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ परिसरातील प्राचीन मंदिरात पुन्हा नव्याने 11 सप्टेंबरपासून पूजा सुरू करण्याचा घोषणा करण्यात आली असून हा दिवस जवळ येत असल्याने त्यासाठी तयारी करण्यात सध्या मंदिर व्यवस्थापन व पुजारी गुंतले आहेत. शुद्धीकरणानंतर पारंपरिक विधिविधान पूजा पाच नोव्हेंबरपर्यंत चालेल.

केदारनाथ परिसरात 16 जून रोजी झालेल्या पावसामुळे विनाशकारी पुरात होत्याचे नव्हते झाले. या परिसरातील वस्तीस्थाने वाहून गेली, रस्ते वाहून गेले. माणसे, घरे मातीच्या ढिगा-याखाली दबली गेली. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली. परंतु केदारनाथच्या प्राचीन मंदिराच्या गाभा-याला कुठलाही धक्का बसला नाही. या मंदिरातील मूळ शिवलिंग मातीच्या ढिगा-याखाली दबले गेले. त्यानंतर या भागात लष्कराच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. मंदिर परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. हे काम अद्यापही सुरू आहे. मंदिराचे पुजारी भीमाशंकर लिंग यांनी कर्नाटकातील दावणगिरी येथून फोनवर सांगितले की, पूजाविधीची तयारी सुरू आहे. 25 ऑगस्ट रोजी या तयारीचा आढावा घेण्यासाठी डेहराडून येथे व्यापक बैठक होणार आहे. केदारनाथ मंदिरात पूजा पुन्हा सुरू व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे, परंतु सर्व विधिविधान कार्य रीतसर पूर्ण केल्यानंतरच तेथे पूजा पुन्हा सुरू होऊ शकेल. केदारनाथमध्ये इतके मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तेथे होमहवन होईल व नंतर पूजाविधी होतील.

कनवकुप्पी मठात केदारनाथमध्ये मृत भाविकांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी रुद्राभिषेक करण्यात येत आहे. त्याबाबत भीमाशंकर लिंग यांनी सांगितले की, पूजाविधीसाठी उपस्थित राहण्याची खूप जणांची इच्छा आहे, परंतु आम्हाला हवामान बदलाचा अर्थ व इतर अडचणीही लक्षात घ्याव्या लागतील.


उखीमठहून केदारनाथचे मुख्य पुजारी बागेश लिंग यांनी सांगितले की, आम्ही पूजासामग्री एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे. शुद्धीकरणासाठी जे काही हवे ते याच मठात एकत्रित केले जात आहे.