आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन देशभक्तच, पंतप्रधानांचे स्वामींवर शरसंधान, वाचा त्यावर स्वामी काय म्हणाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी(फाइल) - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी(फाइल)
नवी दिल्ली- रिझर्व्हबँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या टिपण्ण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी माेदी म्हणाले, कुणी जर स्वत:ला व्यवस्थेपेक्षा वरचढ समजत असेल तर ते चुकीचे आहे. रघुराम राजन हे कमी देशभक्त नाहीत. दरम्यान, मोदींनी खरडपट्टी काढल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांना चक्क गीता आठवली आहे. त्यांनी आज सकाळीच ट्विटरवर श्रीकृष्णाचा उपदेश दिला.
भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार स्वामी यंानी राजन यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली होती. त्यांनी आर्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास आणि नाव घेता अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरीही टीकास्त्र सोडले होते. सोमवारी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोदींना याबाबतीत सवाल करण्यात आला. एनएसजी सदस्यत्वाबाबत मोदी म्हणाले, मागील सरकारांनीही एनएसजी सदस्यत्वासाठी प्रयत्न केलेले आहेत. मात्र आमच्या सरकारने याबाबतीत जास्त यश मिळवले. यामुळेच सरकारवर टीका केली जात आहे.
हास्य-विनोद गायब
माझा स्वभावच विनोदी आहे. मात्र, आजकाल तोही करणे अशक्य बनले आहे. संसदेतून हास्य-विनोद गायब झाले आहेत. तुम्हाला एखादी म्हणही वापरता येत नाही, तिचा काहीही अर्थ लावला जातो.
ट्विटरवर म्हणाले सुब्रमण्यम स्वामी
हे जग एक सामान्य संतुलन आहे. त्यातील कोणत्याही पॅरामिटरमध्ये जरा बदल झाला तर त्याचा परिणाम संतुलनावर होतो. त्यामुळे श्रीकृष्णाने सुख दुखे... सांगितले आहे.
स्वामींवर नाराज जेटली घेणार मोदींची भेट
स्वामींच्या वक्तव्यांवर नाराज असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. स्वामींनी जेटलींवर अप्रत्यक्षपणे अनेकदा हल्ला केला आहे. विदेश दौऱ्यांमध्ये मंत्र्यांनी टाय-सुट घायला नको. त्यात ते वेटरसारखे दिसतात, असे स्वामी म्हणाले होते.
पुढाल स्लाइ्डसवर वाचा, आणखी काय म्हणाले मोदी, GST वर काय केले भाष्य...
चीन दौरा सोडून जेटली का परतले मायदेशी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...