आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२७ महिन्यांत मोदी दर महिन्यालाच परदेशात! २०१५ मध्ये २७ तर २०१६ मध्ये १७ देशांचा दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम, चीन अाणि लाअाेसच्या दाैऱ्यावर अाहेत. चीनमध्ये ते जी-२० शिखर परिषदेत सहभागी हाेतील. पंतप्रधान झाल्यापासून माेदींचा हा ४५ वा विदेश दाैरा असून विद्यमान दाैरा संपल्यानंतर त्यांनी अर्धशतक पार करून जगातील ५३ देशांना भेट दिल्याची नाेंद हाेईल.
सप्टेंबर राेजी ते लाअाेसहून परत येतील त्या दिवशी पंतप्रधान हाेण्यास त्यांचे ८३४ दिवस पूर्ण झालेले असतील. पैकी १२० दिवस ते विदेशात आहेत.डाॅ. मनमाेहनसिंग यांनी दाेन वर्षांत केवळ १४, तर अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ देशांचे दाैरे केले हाेते. माेदींचा दाेन वर्षांतील विदेशवारीचा अाकडा ३६ वर गेला आहे. विविध महत्त्वाच्या कारणांनी, भारताचे अांतरराष्ट्रीय संबंध अधिक भक्कम व्हावेत, देशात उद्याेग यावेत राेजगार निर्मिती व्हावी यासाठी हे दौरे हाेते.मोदींचे काही दौरे खर्चिक ठरले आहेत. त्यात मुख्यत्वे आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा खर्च ८.९१ कोटी, अमेरिका ६.१३ कोटी, जर्मनी २.९२ कोटी, फिजी २.५९ कोटी तर चीन दौऱ्याचा खर्च २.३४ कोटी आहे. भूतान दौरा ४१.३३ लाख रुपये खर्चाचा आहे.

केवळ महिने मायदेशी
माेदींनी अमेरिकेचे चार तर अफगाणिस्तान, फ्रान्स, नेपाळ, रशिया अाणि सिंगापूर येथे दाेन वेळा भेटी दिल्या. मोदींचा व्हिएतनाम चीन- लाअाेस हा दाैरा पूर्ण झाला की २०१४ मध्ये २७ दिवस, २०१५ मध्ये २७ दिवस, तर २०१६मध्ये २८ दिवस अशी विदेशवारी पूर्ण होईल. माेदींना पंतप्रधान हाेऊन २६ महिने पूर्ण झाले अाहेत. यात केवळ महिनेच त्यांनी दौरा केला नाही.
बातम्या आणखी आहेत...