आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Condemns Blasts Whereas Opposition Slams Center And State Government

पंतप्रधानांकडून हल्‍ल्‍याचा निषेध, विरोधकांची सरकारवरच टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- महाबोधी मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रतिक्रीया देताना अशा प्रकारचे हल्‍ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. तर विरोधकांनी मात्र केंद्र आणि राज्‍य सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान म्‍हणाले, भारतात अनेक धर्म आणि पंथाचे लोक राहतात. सर्व धर्मांचा आदर आम्‍ही करतो. त्‍यामुळे धार्मिक स्थळांना अशाप्रकारे कुणी लक्ष्य केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही महाबोधी मंदिरावर झालेल्‍या हल्‍ल्‍याचा निषेध केला.