आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Jan Dhan Yojna To Start From Today

मनरेगाला उत्तर : आजपासून जन-धन योजना, पहिल्या दिवशी एक कोटी खात्यांचे उद्दिष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यूपीए सरकारने देशातील पाच कोटी कुटुंबांतील १२ कोटी लोकांना लाभदायक ठरणारी मनरेगा योजना आणली होती. या योजनेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनडीए सरकार जन-धन योजना सुरू करत आहे. याचा शुभारंभ गुरुवारी होईल. पहिल्याच दिवशी एक कोटी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

२०१८ पर्यंत ७.५ कोटी कुटुंबांची १५ कोटी बँक खाती उघडलेली असतील. योजनेचे चार पैलू आहेत. पहिला- मोदी सरकारला मनरेगाप्रमाणे मिळणारा राजकीय फायदा. दुसरा- सामान्य लोकांना मिळणारी आर्थिक, सामाजिक सुरक्षा, तिसरा- बँकिंग आणि विमा क्षेत्र व्यवहारातील उसळी आणि चौथा- सर्वांना सबसिडी देण्याऐवजी विशिष्ट लाभार्थींना फायदा पोहोचवणे हा यामागचा हेतू आहे. शहरातील ७.४४ कोटी, तर ग्रामीण भागातील २.५५ कोटी लोकांचे बँक खाते नसल्यामुळे योजना सुरू केली जात आहे.

भास्कर एक्सपर्ट पॅनल
डीएच पाय पणिकर, इंडिया थिंक टँक द आरपीजी फाउंडेशन.
प्रणव सेन, अध्यक्ष, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग.
अरजित सेन, माजी सदस्य, नियोजन आयोग.
एस. के. मंडल, आर्थिक प्रकरणाचे जाणकार.
पुढे वाचा काय आहे योजना...
(सर्व फोटो प्रतिकात्मक)