आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 सेकंद व 5 फोटोंमधून जाणून घ्या मोदींच्या 5 देशांच्या दौर्‍याचे इंडिया कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 तासांत 33 हजार किलोमीटर प्रवास करून नुकताच पाच देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. मोदींनी 6 दिवशीय विदेशी दौर्‍यांत अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका व मॅक्सिकोचा दौरा केला.

पंतप्रधानांच्या या दौर्‍याचा थेट संबंध देशातील प्रत्येक घरातील किचन व दोन वेळच्या जेवणाशी जोडला जात आहे. आपल्या खिशावर देखील मोदींच्या या दौर्‍याचा प्रभाव राहाणार आहे. होणार असल्याची चर्चा आहे.

पुढील 5 स्लाइड्सवर क्लिक करून 50 सेकंदांत जाणून घ्या, मोदींचा पाच देशांचा दौरा व त्याचे भारताशी असलेले कनेक्शन...

मोदींच्या दौर्‍याचे हायलाईट्स...
1. अफगाणिस्तानातून प्रारंभ..
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी (4 जून) अफगाणी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी अफगाणिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
- 'अमीर अमानुल्ला खान' पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव आहे. मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित केले.
- अफगाणिस्तानचा हा सन्मान म्हणजे बंधुभावाचा उत्तम नमूना असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी 'ट्विट' करताना म्हटले.
- मोदींनी अफगाणिस्तानातील सतराशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मैत्री धरणाचे (सलमा धरण) उद्घाटन केले. यातून संपूर्ण जगाला मैत्रीचा नवा संदेश दिला.
- या धरणाचे नामकरण मोदी यांनी `इंडिया-अफगाण फ्रेंडशिप’ असे करताच गनी यांनी त्यांचे आभार मानले.

2. कतार केले भारतीय कामगारांसोबत जेवण
- कतारमधल्या भारतीय कामगारांनी आयोजित केलेल्‍या एका कार्यक्रमाला त्‍यांनी उपस्‍थ‍िती लावली.
- उद्योजकांसोबत चर्चा करून भारतात गुंतवणूक वाढवण्‍याचे आवाहन केले.

भारतीय कामगारांसोबत केले जेवण
-मोदी यांनी कतारची राजधानी देहा येथे भारतीय कामगारांसोबत जेवण केले. ते म्‍हणाले, ''खूप मेहनत करा. पण, आपल्‍या आरोग्‍याची काळजीही घ्‍या. स्‍वत:ला निरोगी ठेवणे गरजेचे आहे'', असे ते म्‍हणाले.
- जगात भारतीयांची ओळख ही पंतप्रधानामुळे होत नाही तर तुमच्‍या चांगल्‍या वर्तनाने होते, असेही ते म्‍हणाले.
-मोदी यांनी कतारमधील उद्योजकांसोबत गोलमेज कॉन्फ्रेंसमध्‍ये भाग घेतला.
- मोदींनी म्‍हटले, "भारत संधीची भूमी आहे. तुम्‍हाला या संधीचा फायदा घेण्‍यासाठी मी स्‍वत: आंमत्रित करतो."

3. स्वित्झर्लंडचा काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा
- न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशास स्वित्झर्लंडने पाठिंबा दिल्याने एनएसजी सदस्य बनण्याच्या भारताच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
- उभय देशांनी करचोरी आणि काळ्या पैशाच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाबाबतचे सहकार्य वाढविण्यावर स्विस राष्ट्राध्यक्ष जोहान शायन्डर अम्मान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली.

4. यूएसने भारताला परत केल्या प्राचीन भारतीय मूर्ती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेने काही प्राचीन मूर्ती भारताला परत केल्या आहेत.
- जैन मूर्ती, ब्रॉंझच्या गणेश मूर्तीचा समावेश आहे. चोरी किंवा अन्य मार्गाने अमेरिकेत आलेल्या प्राचीन भारतीय मूर्ती भारताला पुन्हा परत मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
- अमेरिका जवळपास अशा 200 मूर्ती भारताला परत करणार आहे.
- मोदी व्हाइट हाऊसमधील मोठ्या ब्लेअर हाऊसमध्ये थांबले.
- दोन वर्षीत मोदी व ओबामांची ही सातवी भेट होती.
- एनएसजीसाठी अमेरिकेने पाठिंबा दर्शवला.
- अमेरिकेतील टॉप-25 CEOs ना मोदी भेटले. इंडिया-यूएस बिझनेस काउंसिलने भारतात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.
- मोदींनी यूएस कांग्रेसच्या जॉइंट सेशनमध्ये अमेरिकन खासदारांना संबोधित केले.

5. मॅक्सिकोचे अध्यक्ष बनले मोदींचे सारथी..
- मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष पेना निटो यांनी गुरुवारी शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वत: वाहन चालवले.
- निटो यांनी मोदींना गाडीने मॅक्सिकोच्या व्हेज रेस्तराँमध्ये नेले. किंटॉनील नावाच्या रेस्तराँमध्ये मोदींनी शाकाहारी भोजनाचा स्वाद घेतला.
- त्याअगोदर निटो यांनी मोदींच्या स्वागताचे छायाचित्र ट्विट केले. त्यावर मोदींनी आभाराची प्रतिक्रिया दिली.
- मॅक्सिकोने भारताला एनएसजी अर्थात अणुपुरवठादार संघटनेच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...