आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर मोदींच्या पाठोपाठ सर्वाधिक फॉलो केला जाणारा भारतीय बनला विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कर्णधार बनलेल्या कोहलीच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. - Divya Marathi
क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कर्णधार बनलेल्या कोहलीच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा चॅॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव झाला असला तरीही सोशल मीडिया साइट फेसबुकवर त्याच्या  चाहत्यांची संख्या दिवसेंिदवस वाढतच आहे. फायनलमध्ये पाकविरुद्ध विराटची बॅट शांत होती. यानंतर कोच कुंबळेसोबत वादाने विराट अधिक चर्चेत आला. मात्र, त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी होण्याच्या मार्गावर नाही.  सोशल मीडिया साइट फेसबुकवर कोहलीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की त्याने चित्रपट अभिनेता दबंग सलमान खानला मागे टाकले आहे. फेसबुकवर आता कोहलीच्या पुढे फक्त एकच भारतीय आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.    

क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कर्णधार बनलेल्या कोहलीच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या काळात त्याने सर्वांत आधी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. आता कोणताही बाॅलीवूडचा सेलिब्रिटी त्याच्यापुढे नाही. दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा या सर्वांना कोहलीने मागे टाकले आहे. फेसबुकवर कोहलीच्या चाहत्यांची संख्या साडेतीन कोटीपेक्षा अधिक झाली आहे. कोहलीच्या चाहत्यांची संख्या सलमान खानच्या चाहत्यांपेक्षा अधिक आहे. फेसबुकवर कोेहलीचे चाहते सलमानच्या चाहत्यांच्या तुलनेत ६ लाखाने अधिक आहेत.    

कोहलीला फेसबुकवर साडेतीन कोटी चाहते, ट्विटरवर एक कोटी चाहते तर इंस्टाग्रामवर एक कोटी चाळीस लाख चाहते फॉलो  करतात. लोकप्रियतेत कोहलीच्या पुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. फेसबुकवर मोदी यांचे चार कोटी २२ लाख फॉलोअर आहेत. येत्या काही दिवसांत कोहलीच्या चाहत्यांची संख्या कमी होते की ती वाढून तो मोदी यांना मागे टाकतो, हे  बघावे लागेल. 
बातम्या आणखी आहेत...