आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबाद मेट्रोचे झाले उद्घाटन, मियापूर-कुकतपल्लीदरम्यान मोदींनी केला मेट्रो प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी हैदराबाद मेट्रो ट्रेनचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांच्यासह मियापूर ते कुकतपल्लीदरम्यान मेट्रोने प्रवासही केला. पहिल्या टप्प्यात ही सेवा मियापूरहून नागोलदरम्यान 30 किमीमध्ये सुरू करण्यात आली आहे. यात 24 स्टेशन असतील. गुरुवारपासून येथे मेट्रो ट्रेनची व्यावसायिक सेवा सुरू होईल. मियापूर-नगोले मार्गावर या मेट्रोसाठी खासगी संस्थांचे 546 सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. या मेट्रोची पहिली लोको पायलट (ड्रायव्हर) एक महिला आहे.

 

सकाळी 6 ते 10 पर्यंत सुरू राहील मेट्रो
- तेलंगणचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री टी. रामाराव म्हणाले की, सुरुवातीला मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहील.
- प्रवाशांची संख्या आणि मागणी पाहून ही वेळ वाढवून सकाळी 5.30 ते रात्री 11 पर्यंत केली जाईल.

 

PPP मधून बनलेला सर्वात मोठा मेट्रो प्रोजेक्ट
- रामाराव म्हणाले की, हा एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मधून बनलेला सर्वात दीर्घपल्ल्याचा मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट आहे.
- ते म्हणाले की, या प्रोजेक्टअंतर्गत चालणाऱ्या सर्व रेल्वेत सुरुवातीला 3-3 कोच असतील. प्रत्येक कोचमध्ये 330 प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवासी वाढल्यावर कोचची संख्या वाढवून 6 केली जाईल.

 

10 ते 60 रुपयांपर्यंत असेल किराया
- रामाराव म्हणाले की, एलअँडटी मेट्रो रेल्वे (हैदराबाद) लिमिटेडने दोन किलोमीटर अंतरासाठी कमीत कमी 10 रुपये आणि 26 किमीसाठी जास्तीत जास्त 60 रुपये किराया आहे.


भाजप कार्यकर्त्यांना काय म्हणाले मोदी
- तत्पूर्वी, हैदराबाद एअरपोर्टवर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले- आम्ही देशाच्या संपूर्ण विकासात विश्वास ठेवतो. ज्या राज्यात आमचे सरकार नाही, तेथे विकास करणार नाही, याचा आम्ही विचारही करू शकत नाही. आम्हाला पूर्ण देशाचा विकास करायचा आहे. 
- पंतप्रधान पुढे म्हणाले- देशाच्या दक्षिण भागात भाजपला राज्य सरकार म्हणून जास्त सेवा करण्याची संधी मिळालेली नाही. तरीही आमच्या कार्यकर्ते लोकांची कामे करतात. आम्हाला कार्यकर्त्यांच्या या परिवारावर गर्व आहे. संपूर्ण जग आज हैदराबादकडे आशेने पाहत आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...