आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आज चीनमध्ये, जिनपिंग यांच्या मूळ गावाला प्रथमच भेट देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चीनला रवाना झाले. त्यांच्या चीन दौऱ्याची सुरुवात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मूळ गावापासून होणार आहे. जिनपिंग भारतात आले होते तेव्हा त्यांनी मोदी यांच्या गुजरातपासून भेटीला सुरुवात केली होती.
मोदी-जिनपिंग यांच्यातील ही तिसरी भेट असेल; परंतु या वेळी सीमावादाऐवजी व्यापारावर चर्चा अपेक्षित आहे. सीमावादाला एक मर्यादा असते, परंतु व्यापाराच्या शक्यता मात्र अमर्याद आहेत, याची उभय नेत्यांना जाणीव आहे.
मोदी यांच्यासोबत उद्योगपतींचे मोठे शिष्टमंडळही गेले आहे. त्यात अंबानी, अदानी, विशाल सिक्का, दिलीप सांघवी, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या सीईआेंसह १५-१६ उद्योगपती सहभागी झाले आहेत. दरम्यान, भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून विकासाच्या हायस्पीड ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. मी मोदींचे स्वागत करतो, असे चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी म्हटले.

गुंतवणूकवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर
महाराष्ट्रात गुंतवणूकवाढीच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारपासून पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात अाहेत. तेथे ते काही उद्योगांना भेटी देऊन उद्योजकांशी चर्चाही करतील. बीजिंग येथे शुक्रवारी पंतप्रधान मोदींसोबत ते ‘स्टेट/प्रोव्हिन्शियल लीडर्स फोरम’मध्ये सहभागी होतील. या वेळी ‘भारत-चीन विकास भागीदारी संबंध वाढवण्यात राज्यांची भूमिका' आणि ‘सस्टेनेबल अर्बनायझेशन : स्मार्ट सिटी, स्मार्ट लिव्हिंग’ या चर्चासत्रांतही फडणवीस सहभागी होतील. याप, तैयुआन हेवी इंडस्ट्री, सीजीजीसी, ग्रेट वॉल मोटार्स, सॅनी या उद्योगसमूहांसोबत शनिवारी मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. त्याच दिवशी डुंगहाँग येथे औरंगाबाद आणि डुंगहाँग (गानसू) या शहरांमध्ये सिस्टर सिटी करार होणार असून त्यासाठी परस्पर सहकार्याबाबत चर्चाही होईल. रविवारी ते किंगडाओच्या महापौरांची सदिच्छा भेट घेतील. गुरुवारी झेंगझाऊ भेटीवेळी मुख्यमंत्री फॉक्सकॉन उद्योगाच्या उत्पादन केंद्राला भेट देतील. फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गौ यांच्याशी चर्चा करतील. बीजिंग येथील फोरममधील सहभागानंतर मुख्यमंत्री बैकी फोटॉनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिनयू वांग यांची भेट घेतील. अधिकाधिक उद्योग, कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक होऊन मेक इन महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रयत्नशील असणार आहेत. सोमवारी हेअर उद्योग समूहाबरोबर चर्चा करतील. दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर हेही सहभागी होणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ३ दिवस- २२ कार्यक्रम