आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Pays Tribute To Bhagat Singh, Sukhdev, Rajguru News In Marathi

भगतसिंगांचे जीवनचरित्र ही तर जगण्याची प्रेरणा : नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‘आज शहिदांच्या पावन भूमीत आलो हे मी माझे भाग्य समजतो. भगतसिंग यांचे जीवनचरित्र आपल्याला कायम जगण्याची प्रेरणा देत राहील,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीददिनी हुसेनीवाला येथील स्मारकाला भेट देऊन भावना व्यक्त केल्या. या वेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजप सरकारच्या विविध योजनांचाही पाढा वाचला.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी संपूर्ण सभेत यासंबंधी योजनांवरच भर दिला. भ्रष्टाचाराने या देशाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२०२२ मध्ये भारतात या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमृत पर्व साजरे केले जाणार असल्याचे सांगून तोपर्यंत पंजाबमध्ये एकही व्यक्ती बेघर असणार नाही, अशी केंद्र सरकारची इच्छा असल्याचे मोदी यांनी नमूद केले. माेदींनी स्वच्छ भारत अिभयानाचाही आवर्जून उल्लेख केला. २०१९ मध्ये महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने या देशातील प्रत्येक घर, रस्ते व वस्त्या स्वच्छ व्हाव्यात, असे मोदी म्हणाले.

थेंब थेंब पाणी...
मोदी यांनी शेतकऱ्यांना पाणीबचतीचा मंत्र दिला. पिकांना थेंब थेंब पाणी देऊन पाणी बचत करावी, असे आवाहन करून शेतकऱ्यांसाठी पिके पोटच्या मुलांसारखी असल्याचे ते म्हणाले. पाण्याची बचत केली तर पंजाबमधील पाण्याच्या समस्येवर तत्काळ तोडगा निघू शकतो, असेही मोदी म्हणाले.

३० वर्षांनंतर...
हुसेनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण करणारे गेल्या ३० वर्षांतील नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे हे स्मारक पाकिस्तान सीमेपासून जवळ आहे.

मोदी म्हणाले..
>पंजाबशी माझे रक्ताचे नाते आहे. म्हणूनच आज हे कर्ज चुकते करण्याची वेळ आली आहे.
> भगतसिंग यांच्या नावाने फलोद्यान विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा.
> केवळ शेतीवर पोट भरत नाही म्हणून शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन देणार
> देशाचा खरा विकास घडवायचा असेल तर शेतकऱ्यांसोबत गावे सुधारली पाहिजेत.
> उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असताना रासायनिक खतांमुळे धरती मातेचे आरोग्य बिघडू शकते. याकरिता शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्ड दिले जाईल.

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो..