आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Said The Cabinet Meeting Was Demonetisation Thought, I Just Responsible Fails

नोटबंदी: अपयशी ठरल्यास फक्त मी जबाबदार, कॅबिनेट बैठकीत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोटबंदीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय आणखी कोणाचा मेंदू होता? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मात्र सूत्रांच्या मते, मोदींनी महसूल सचिव हसमुख अधियांसह ६ लोकांवर ८२ टक्के चलन झटक्यात बाद करण्याची जबाबदारी दिली होती. संशोधनाचे काम मोदींच्या घरी दोन खोल्यांत सुरू होते.
संशोधन करणारे तरुण मोदींचे सोशल मीडिया अकाउंट व अॅप सांभाळतात. मोदींनी नोटबंदीपूर्वी कॅबिनेटची घेतली होती. बैठकीला हजर तीन मंत्र्यांच्या मते, ‘मी संशोधन केले आहे. नोटबंदी अपयशी झाली तर त्याला फक्त मी एकटाच जबाबदार असेल, असे मोदी म्हणाले होते.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००३-०६ दरम्यान अधिया मुख्य सचिव होते. तेव्हापासून दोघांत विश्वास आहे. अधिया सप्टेंबर २०१५ मध्ये महसूल सचिव बनले. काळ्या पैशांविरुद्ध वर्षभर काम सुरू होते.
नव्या नोटा किती दिवसांत छापून होतील? वितरणाला किती वेळ लागेल? नोटबंदीचा काय फायदा होईल? असे प्रश्न स्वतंत्रपणे अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक व थिंक टँकला विचारले गेल्याने कोणालाही नोटबंदीच्या निर्णयाचा अंदाज आला नाही.
बँकांतून २४ हजारही का मिळत नाहीत?
नवी दिल्ली | बँकेतून आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. परंतु ती रक्कम बँका देत नाहीत. परिस्थिती सामान्य व्हायला किती दिवस लागतील? जिल्हा मध्यवर्ती बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा देऊ शकता का? असे प्रश्न सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्राला विचारले व बुधवारपर्यंत त्याची उत्तरे देण्याचे निर्देश दिले. १०-१५ दिवसांत स्थिती निवळेल, असे केंद्राने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...