आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Tells SPG Men To Keep Distance From Him

गोपनीय माहिती लीक होऊ नये म्हणून, मोदींना हवा एसपीजी कमांडोंपासून दुरावा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली - केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'हेरगिरी' प्रकरणातील वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणा-या एसपीजी (स्‍पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप) च्या कमांडोंना त्यांच्यापासून जरा दुरावा ठेवण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमांडोंना पंतप्रधानांपासून दूर उभे राहण्याचे निर्देश देण्यामागे, गोपनीय माहिती लीक होऊ नये हा उद्देश आहे. आधीच्या एका घटनेमुळे मोदींनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे भाजप नेते आनंदी असल्याचे समजते आहे.

एसपीजी कमांडोंना दुरावा ठेवण्याचे निर्देश
एसपीजीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी अशा प्रकारचे निर्देश देण्यामागील कारण म्हणजे, त्यांच्या गोपनीय चर्चांमधील माहिती लीक होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. सरकारी सुत्रांच्या मते मोदींच्या या निर्णयानंतर एसपीजी कमांडोंची संख्या वाढवली जाऊ शकते. मोदींच्या सुरक्षाकवचामध्ये एसपीजीचे 6 ते 8 कमांडो असतात. या पथकाचा प्रमुख उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो.

दुधाने पोळले म्हणून...
सुत्रांनुसार या घटनेच्या कारणाच भूतकाळातील एका घटनेचा संदर्भ असू शकतो. त्यावेळी एसपीजीमध्ये बदली झालेल्या आयपीएस अधिका-यावर माजी पंतप्रधानांच्या चर्चा ऐकूण माहिती पुरवल्याचा आरोप होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या कॅडरमध्ये पाठवण्यात आले होते.
निर्णयाने नेते आनंदी
मोदींच्या या निर्णयाने भाजप नेते आनंदी आहेत. त्याचे कारण म्हणजे, त्यांना आता मोदींजवळ उभे राहून चर्चा करता येईल. कारण अनेकदा एसपीजी कमांडोंच्या घेरावामुळे नेत्यांना मोदींपासून दूर राहावे लागायचे.