आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi To Inaugurate Two Day Global Conference On Cyberspace

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनधन-आधार-मोबाइलमुळे देशवासीयांसाठी नवनवे मार्ग उपलब्ध झाले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सायबर स्पेसवर प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. या वेळी ते म्हणाले- मागच्या दोन दशकांपासून सायबर स्पेसच्या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. अगोदर फोन आला, मग मोबाइल आणि आता सोशल मीडियाने माहिती-तंत्रज्ञानाला मोठी चालना दिली आहे. भारतात जनधन- आधार- मोबाइल (JEM)ने सर्वसामान्यांसाठी नवे मार्ग उपलब्ध केले आहेत. आज भारताचा शेतकरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऑपरेट करतो." या परिषदेत 120 देश सामील झाले आहेत.

 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील 4 मुख्य मुद्दे


1) तंत्रज्ञानामुळे अडथळे दूर होतात
- पीएम मोदी म्हणाले- तंत्रज्ञानामुळे अडथळे दूर होतात. यामुळे भारताच्या वसुधैव कुटुंबकमच्या सिद्धांताला योग्य सिद्ध केले आहे. आज अवघे जगच वैश्विक खेडे बनले आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीने सर्व्हिस डिलिव्हरी आणि गव्हर्नन्सच्या कामाला वाव दिला आहे. भारताच्या आयटी तंत्रज्ञानातील कौशल्याला जगभरात सन्मानाने पाहिले जाते.

 

2) जनधन-आधार-मोबाइल चा फायदा झाला
- मोदी म्हणाले- जनधन खाते, आधार आणि मोबाइलने भ्रष्टाचार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आली आहे.

 

3) कोट्यवधी जनता MyGoV पोर्टलवर प्रतिसाद देते
- मोदी म्हणाले, 2014 मध्ये तरुणांच्या अनेक कल्पना होत्या, ते देशासाठी काम करू इच्छित होते. सरकारने सिटिजन एंगेजमेंट पोर्टल MyGoV लाँच केले. यावर कोट्यवधी लोकांनी रिस्पॉन्स दिला.

 

4) डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे लोकांच्या उत्पन्नात भर पडली
- डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे लोकांच्या उत्पन्नात भर पडली आहे. यामुळे नवा व्यवसाय सुरू करण्यासाठीही मोठी मदत मिळाली. भारतीय आता कॅशलेस इकॉनॉमी स्वीकारत आहेत. आम्ही मोबाइल पॉवरच्या माध्यमातून जनतेला सक्षम बनवत आहोत.

 

संमेलनात कोणत्या विषयावर चर्चा होईल?
-सायबर फॉर डिजिटल इन्क्लूजन, सायबर फॉर इन्क्लूसिव्ह ग्रोथ, सायबर फॉर सिक्युरिटी आणि सायबर फॉर डिप्लोमसीवर चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून फ्रान्स, जपान, इस्रायल आणि ब्रिटनसहित 120द देशांचे तब्बल 10 हजार रिप्रेझेंटेटिव्ह यात सामील होतील. याआधी हे संमेलन लंडन आणि बुडापेस्टमध्ये झालेले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...