आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Uk Visit Second Day

#ModiInUK: राणी एलिझाबेथसोबतच्या लंचसाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच्या ब्रिटन दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी त्यांनी 40 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा केली. यात भारताचे 20 आणि इंग्लंडचे 20 सीईओ सहभागी झाले होते. या चर्चेत मोदी म्हणाले, भारत आणि इंग्लंड आर्थिक धोरणांसाठी एकमेकांना पुरक आहेत. या क्षेत्रातील संबंध खासगी कंपन्यांच्या सीईओजनी वृद्धींगत केले पाहिजे. आम्हाला भारतातील रेल्वे स्टेशन पीपीपी मॉडेलने (पब्लिक प्रायव्हेट पार्टर्नशिप) विकसित करायचे आहेत. संरक्षण क्षेत्रातील निर्मीतीवरही जोर द्यायचा आहे. या सर्व बाबी मेक इन इंडियाचा कणा असणार आहेत. आम्हाला विश्वास आहे की जगाच्या अर्थव्यवस्थेत आमचे स्वतःचे स्थान असेल.
सायरस मिस्त्रीने केले सीईओंचे नेतृत्व
>> सीईओ फोरमच्या बैठकीचे नेतृत्व टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केले. इंग्लंडमध्ये टाटा-जॅग्वार सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी आहे. टाटा ग्रुपने 65 हजार ब्रिटन नागरिकांना रोजगार मिळवून दिला आहे.
>> भारती इंटरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल, टाटा कन्स्ल्टंन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर एन. चंद्रसेकरन आणि भारत फोर्जचे चेअरमन बाबा कल्याणी देखील येथे उपस्थित होते.

रॉयल एअरफोर्सचे नऊ विमान आकाशात तयार करणार तिरंगा
पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाला संबोधित करतील तेव्हा ब्रिटीश रॉयल एअरफोर्सचे नऊ विमान वेंब्ली स्टेडियमवरुन उड्डाण करत आकाशात तिरंगा तयार करतील. सर्व नऊ रेड एअरो पायलट रॉयल एअरफोर्स स्क्वॉर्डन्स असतील. 10 डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळी सेलिब्रेशन दरम्यान डेव्हिड कॅमरुन म्हणाले होते, की रॉयल एअरफोर्सला आकाशात तिरंगा तयार करण्यासाठी मोठी तयारी करावी लागली आणि त्यासाठी अनेक अनेक अडचणींवर मात केली. कॅमरुन म्हणाले होते, 'मला आशा आहे तिरंग्याचे सादरीकरण शानदार राहिल. रेड ऐरो प्रथमच भारतीय झेंड्याचे डिझाइन तयार कणार आहेत. मी तुम्हाला सांगू शकत नाही केशरी रंग तयार करण्यासाठी आम्हाला किती कष्ट पडले. आमच्यासाठी हे फार अवघड होते. मात्र ये संस्मरणीय राहील.'
चेकर्स कोर्टमध्ये थांबले होते मोदी, कॅमरुनसोबत केला मॉर्निंग वॉक
>> मोदींचा मुक्काम ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरुन यांच्या शासकीय निवासस्थान चेकर्स कोर्ट येथे होता.
>> शुक्रवारी सकाळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सोबत मॉर्निंग वॉक केला.
>> मोदींनी ब्रिटनच्या फर्स्ट लेडी सामंथा कॅमरुन यांना लाकूड-मार्बल आणि चांदीने बनविलेले बुकेंड, काश्मिरी पश्मिना शॉल, केरळ हस्तकलेचा नुमाना असलेला आरसा भेट दिला.
>> बुकेंडमध्ये चांदीचा घंटी आहे, ज्यावर गीतेचे श्लोक लिहिलेले आहेत. त्याचा इंग्रजी अर्थही त्यावर आहे.

पुढे कसा असेल कार्यक्रम
>> मोदी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत लंच करतील.
>> लंडनमध्ये वेंब्ली स्टेडियममध्ये भारतीय समुदायासमोर भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात 60,000 लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
>> मोदींच्या भाषणाआधी जवळपास 600 कलाकार परफॉर्म करतील.
>> विशेष म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत लंच आणि वेंब्ली स्टेडियम येथील कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन मोदींसोबत असतील.

असहिष्णुतेवर काय म्हणाले नरेंद्र मोदी
ब्रिटन दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतात वाढलेल्या कथित असहिष्णुतेवर मोदींना पहिला प्रश्न विचारण्यात आला. असहिष्णुते संदर्भात घडणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे सांगत मोदी म्हणाले होते, 'भारत हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश आहे. प्रत्येक नागरिकाचा येथे सन्मान आहे. त्यांचे आणि त्यांच्या विचारांचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. यासंदर्भात घडणाऱ्या घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत. आमच्यासाठी प्रत्येक घटना महत्त्वाची आहे. मग त्यात आम्ही विचार करत नाही की घटना एक आहे, की दोन आहे, की तीन आहेत. आम्ही ते सहन करणार नाही. कायद्याने कठोर कारवाई होत आहे. यापुढे ही होत राहिल.'
पुढील स्लाइडमध्ये, मोदींनी कोणत्या भेटवस्तू दिल्या