आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे देशात पहिले टाऊन हॉल, गाय-दलित-काश्मीर मुद्द्यावर नाही विचारता येणार प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच टाऊन हॉल करणार आहे. शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधून हा कार्यक्रम लाइव्ह केला जाईल. जनतेच्या प्रश्नांना मोदी उत्तर देतील. यात 2 हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले असले तरी प्रश्न विचारण्याची संधी काही मोजक्या लोकांनाच मिळणार आहे. केंद्र सरकारच्या MyGov वेबसाइटच्या लॉन्चिंगला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने या टाऊन हॉलचे आयोजन केले गेले आहे. वेबसाइटवर 35.2 लाख नोंदणीकृत यूजर्स आहेत. त्यातील 2000 जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. या टाऊन हॉलमध्ये वादग्रस्त आणि राजकीय विषयांशी संबंधीत प्रश्न विचारण्याची मुभा नाही.

10-12 जणांनाच प्रश्न विचारण्याची संधी
- सरकारी सूत्रांनी सांगितल्यानुसार, फक्त 10 ते 12 जणांनाच प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
- पंतप्रधानांच्या टाऊन हॉलसाठी MyGov वेबसाइटवरील नोंदणीकृत यूजर्सला बोलावण्यात आले आहे.
- सूत्रांची माहिती आहे की ही वेबसाइटसोबत जवळपास दीड कोटी लोक जोडलेले आहेत. त्यातील 35.2 लाख नोंदणीकृत यूजर्स आहेत. ते वेळोवेळी त्यांचे मत आणि सल्ला येथे देत असतात.
- MyGov वेबसाइटच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यासोबतच येथे सरकारी योजनांची माहिती मिळते.

गाय, दलित, शेतकरी आणि काश्मीर मुद्द्यावर नाही विचारता येणार प्रश्न?
- अशी माहिती आहे की या कार्यक्रमात गाय, दलित, शेतकरी आणि काश्मीर मुद्द्यावर तसेच इतर काही वादग्रस्त विषयांवर प्रश्न विचारण्याची परवानगी नाही.
- या कार्यक्रमाचा उद्देश सरकारच्या योजना आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे हा असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
- काही निवडक प्रश्नांना मोदी उत्तर देणार असले तरी ते भाषण देखील करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...