आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Plans To Crib, Maharashtra Is Not Interested

पंतप्रधान घरकुल योजना; महाराष्ट्राला रस नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली ; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत देशातील गरीब आणि बेघरांसाठी दोन कोटी घरे बांधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प महाराष्ट्रात पूर्णत्वास जाण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. आतापर्यंत १८ राज्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेबाबत अनुकूलता दाखवली आहे; पण त्यात राज्याचे नावच नाही.
देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा ७५ वर्षे होतील तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर हक्काचे छत असेल, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. मोदी सरकार येऊन १६ महिन्यांचा कालावधी उलटला तरी पंतप्रधान घरकुल योजनेला अद्याप सुरुवात झालेली नाही. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाने यासाठी प्रत्येक राज्याकडून आढावा मागितला होता. त्यात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तेलंगण, हिमाचल प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, नागालँड आणि मिझोरम या राज्यांनी अनुकूलता दाखवली आहे. या राज्यांत ५३२ शहरांत घरकुल योजनेद्वारे घरे बांधली जाणार आहेत. केंद्राला या योजनेसंदर्भात काहीही न कळवल्याने या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही. सरकारने योजनेवर आक्षेपही नोंदवले नाहीत.
राज्यात ५५ शहरांत अंमलबजावणी शक्य
ज्या राज्यांनी योजनेसाठी अनुकूलता दर्शवली आहे त्यातील काही राज्यांना अटी व नियमांत बदल हवे आहेत. ज्या बँकांकडून कर्जपुरवठा होणार आहे त्यांनाही या योजनेत काही बदल हवे असल्याने या योजनेचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. देशभरातील ४ हजार ४१ शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार असून महाराष्ट्र या योजनेत सहभागी झाल्यास राज्यातील ५५ शहरांमध्ये गरिबांसाठी पंतप्रधान घरकुल योजनेतून घरे बांधली जाऊ शकतात.