आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Sharif Navajha, Latest News In Divya Marathi

सर्वात चर्चित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकर्षक शपथविधी, आकर्षण ठरणार शरीफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे 16 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभावर जगाचे लक्ष लागलेले असेल. तो भव्य दिव्य करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ या समारंभात सहभागी होणार असल्याने तो आधीपासूनच चर्चेत आला आहे.
या निमंत्रणाचे नवाझ शरीफ यांच्‍यासाठी महत्त्व
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. ते यानंतर आणखी एक दिवस येथे थांबतील, असे मानले जाते. त्यांच्या या दौ-यातून कोणता अर्थ काढला जात आहे? अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे मोदींनी त्यांना पंतप्रधान होताच निमंत्रण दिले. मोदींनी विधानसभा निवडणुकीवेळी पाकिस्तानचा कडवा विरोध केला आहे. त्यामुळे शरीफ यांना निमंत्रित करणे आश्चर्यकारक बाब आहे. या निर्णयावर टीका होऊ शकते याची मोदींना कल्पना आहे, तरीही त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. यामागे नेमका कोणता अर्थ दडला आहे ?
मोदींनी शेजारी देशांशी, विशेषत: पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी हे खास निमंत्रण पाठवले आहे. याचा स्वीकार करावा की नको हे शरीफ यांना तत्काळ कळले नाही.

मोदी सरकारसमोर तीन उद्दिष्टे आहेत -
अर्थव्यवस्था रुळावर आणणे, भ्रष्टाचार नियंत्रणात आणणे, मुस्लिम समाजाचा विश्वास जिंकणे. या पावलास भारतीय मुस्लिमांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्याची सुरुवात म्हणून पाहिले जाते. याच कारणावरून त्यांनी पाकिस्तानसोबत बांगलादेशच्या पंतप्रधानांनाही निमंत्रित केले आहे.
मोदींप्रमाणे शरीफ स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करू शकले. त्यामुळे दीर्घकाळापासून थंडावलेली शांतता चर्चा नव्याने सुरू व्हावी, असे मानले जाते. परराष्टÑ धोरणाच्या दृष्टीने पाकिस्तानचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. यात मोदी ‘फर्स्ट मूव्हर’ होतील.
भारतामध्ये 30 वर्षांनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेजारी देशाने हा जनादेश समजून घ्यावा. शरीफ येणार असतील तर ते पाकिस्तानी लष्कराच्या सहमतीनंतरच येतील, असे मानले जाते.

गेल्या वर्षी नवाझ शरीफ यांनी मनमोहनसिंग यांना शपथविधी समारंभाला बोलावले होते. मात्र, सिंग यांनी त्यास नकार दिला होता.
तीन भागांत बसणार पाहुणे
आपत्कालीन व्यवस्था म्हणून दरबार हॉलही तयार ठेवण्यात आला आहे. पण तेथे केवळ 500 पाहुण्यांचीच व्यवस्था आहे. ममता बॅनर्जींचा सहभागास नकार. निमंत्रण नसल्याची ओमर अब्दुल्लांची तक्रार मोदींचे वाराणसीतील प्रस्तावक शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा, वडोद-याच्या प्रस्तावक महाराणी शुभांगी गायकवाड आणि चहा विक्रेता किरण महिडाहीचा सहभाग.
खासदारांच्या पत्नींना पहिल्यांदाच निमंत्रण नाही
एखाद्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभासाठी खासदारांना एकटेच जावे लागण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. या वेळी खासदारांसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी असणार नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात पाहुण्यांची संख्या हजारोंच्या घरात जात असल्यामुळे या समारंभासाठी खासदारांना एकटेच येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मोदींच्या शपथविधीसाठी सुमारे 4000 पाहुणे अपेक्षित आहेत. त्यामुळे खानपानाची विशेष तयारी करण्यात येत आहे. मेनूला रविवारी अंतिम स्वरूप दिले जाईल पण पाहुणचार कुठे द्यायचा याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व पाहुण्यांची तीन गटांत विभागणी केली आहे. त्यानुसार नॉर्थ कोर्ट, साउथ कोर्ट व जयपूर कॉलममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. नॉर्थ कोर्टमध्ये राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, परदेशी पाहुणे आणि काही अतिथींचे खानपान होईल.व्हीव्हीआयपी अतिथींच्या खानपानाची सोय साउथ कोर्टमध्ये तर अन्य पाहुण्यांचे खानपान जयपूर कॉलममध्ये होईल.