आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister's Air Travel Expenditure Stands At Rs 642 Crore

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 642 कोटींचे हवाई उड्डाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गेल्‍या नऊ वर्षांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या विदेश दौ-यावर विमान प्रवास खर्चावर 642 कोटींपेक्षा जास्‍त रक्‍कम खर्च करण्‍यात आली आहे. माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्‍या प्रश्‍नावर पंतप्रधान कार्यालयाने हा खुलासा केला.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्‍या खुलाश्‍यानुसार, 2004 सालापासून पंतप्रधानपदी विराजमान असलेले मनमोहन सिंग यांनी 67 दौरे केले आहेत. त्‍याचे अद्याप बिल मिळालेले नाही. उर्वरित 62 दौ-यांचे जे बिल मिळाले आहेत. त्‍यावरून त्‍यांच्‍या हवाई उड्डाणावर 642.45 कोटी रूपये खर्च झाले आहेत.

केंद्रीय माहिती आयोगाने एका आदेशात मंत्रिमंडळ सचिवालयाला जनहित लक्षात घेऊन मं‍त्री आणि अतिविशिष्‍ट (व्‍हीव्‍हीआयपी) व्‍यक्‍तींच्‍या यात्रेवर झालेल्‍या खर्चाची सविस्‍तर माहिती देण्‍यास सांगितले आहे. मुख्‍य माहिती आयुक्‍त सत्‍यानंद मिश्रा यांनी म्‍हटले की, लोकांना राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्‍या मोठया व्‍यक्‍तींच्‍या यात्रेबद्दल खूप आकर्षण असते. माहिती कायद्याअंतर्गत कायम अशा दौ-यांची माहिती मागितली जाते.

गेल्‍यावर्षी झालेल्‍या खुलाश्‍यात माजी राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्‍या पाच वर्षांच्‍या कार्यकाळादरम्‍यान विदेशी दौ-यावर 223 कोटी रूपये खर्च केले होते. त्‍यानंतर व्‍हीआयपी दौ-यावरून मोठा वाद सुरू झाला होता.

मनमोहन सिंग यांच्‍या दौ-याची सूची पाहिल्‍यास वर्ष 2012मध्‍ये ते जी 20 शिखर समेंलनासाठी मेक्सिको आणि रिओ प्‍लस 20 शिखर समेंलनासाठी ब्राझीलला गेले होते. त्‍यांच्‍या या सात दिवसीय दौ-यावर सर्वात अधिक 26.94 कोटी रूपये खर्च करण्‍यात आले होते. वर्ष 2010 मध्‍ये ते अणू सुरक्षा संमेलन, ब्रीक संमेलन आणि आयबीएसए संमेलनात भाग घेण्‍यासाठी अमेरिकेच्‍या वॉशिंग्‍टन डीसी आणि ब्राझीलला गेले होते. या दौ-यासाठी 22.70 कोटी रूपये खर्च झाले होते.