आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Karim Aga Khan Meets Indian PM, Prez In Delhi

हुमायूनचा मकबरा स्मारकांचे प्रतीक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : नवी दिल्ली येथे मंगळवारी आगा खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.)
नवी दिल्ली - हुमायूनचा मकबरा भूतकाळ आणि भविष्यकाळ जोडणारा दुवा ठरेल. मकबरा संग्रहालयातील शिकवल्या जाणार्‍या संवर्धनाच्या धड्यामुळे जगभरातील स्मारकांचे ते प्रतीक ठरेल, अशी आशा युवराज करीम आगा खान यांनी व्यक्त केली.

सोळाव्या शतकातील या मकबर्‍याचे बांधकाम मंगळवारी सुरू करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने डिझाइन केलेल्या २५ आदर्श स्मारकांमध्ये हुमायूनच्या मकबर्‍याचा समावेश करण्यात आला आहे. हुमायूनचे स्मारक २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून ते गेल्या सात शतकांतील निझामुद्दीन क्षेत्राचे प्रतीक ठरणार आहे. संग्रहालय भूतकाळ आणि भविष्यकाळाशी जोडणारा पूल ठरणार आहे. स्मारक आधुनिक दिल्ली व त्याच्या वारसाशी जोडणारे असेल, असे आगा खान यांनी वारसा स्थळाच्या कोनशिला समारंभात सांगितले.

नगरोत्थान योजनेचा भाग म्हणून आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर फॉर आर्ट (एकेटीसी) भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मदतीने स्मारकाचे बांधकाम करत आहे. पर्यटन मंत्रालयाने त्यासाठी ४९ कोटी रुपये निधी दिला आहे. जागतिक वारसा कॅम्प्लेक्सच्या प्रवेशद्वारावर स्मारक बांधले जाईल. सरकारच्या सहकार्यात अप्रतिम स्मारक उभारले जाईल, असे एक-दीड वर्षापूर्वी सांगितले होते. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा संवर्धनाबाबत दिल्या जाणार्‍या शिक्षणातून हुमायून मकबरा जगातील स्मारकांचे प्रतीक ठरेल, असे आगा खान यांनी सांगितले.

एकेटीसीकडे अन्य वारसा स्थळांसाठी प्रस्ताव
७८ वर्षीय खान यांना बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरकारने देशातील जागतिक वारसा स्थळांमध्ये हुमायून टॉम्ब मॉड्यूल विकसित करण्याचा प्रस्ताव एकेटीसीकडे ठेवला. ताजमहालापासून त्याची सुरुवात करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे एकेटीसीने म्हटले आहे. ताजमहालासमोर अशी प्रतिकृती निर्माण करण्याबाबत साशंक आहोत. मात्र, आम्ही आमच्या परीने योगदान देऊ, असे त्यांनी सांगितले.