आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan News In Marathi, Chief Minister Of Maharashtra,

संघर्षाची ठिणगी: नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री चव्हाण यांचा बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्यात येत असल्यामुळे मोदींच्या कार्यक्रमात हजर राहू नका असे काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना बजावताच उद्या गुरुवारी नागपुरातील मेट्रोच्या भूमिपूजन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. यामुळे भारताच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासात नव्याच संघर्षाला तोंड फुटणार आहे.

मुंबईत सह्याद्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. उरण तसेच सोलापूर येथे गेल्या आठवड्यात झालेल्या पंतप्रधानांबरोबरच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आलेले बहुतांश लोक हे काही विशिष्‍ट हेतूने प्रेरित होऊन आले होते. त्यांच्या घोषणाबाजीतून तसे दिसून आले. असे प्रकार पुढे होऊ नये म्हणून नागपूरला न जाण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या निर्णयाला हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची जोड दिली.नागपूर येथील कार्यक्रमाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रतिनिधी मात्र जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अतिउत्साह दाखवू नका
विधानसभा नविडणुका होऊ घातलेल्या राज्यांमध्ये राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांबाबत कमिान काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तरी जास्तीचा उत्साह दाखवू नये. पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केवळ शिष्टाचार पाळावा, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हुटिंगमुळे हुडांचाही बहिष्कार
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कैथल येथील कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्या विरोधात लोकांनी प्रचंड घोषणाबाजी करून त्यांचे भाषण बंद पाडले होते. त्यामुळे यापुढे मोदींच्या उपस्थितीतील कोणत्याही कार्यक्रमांना आपण हजर राहणार नसल्याचा निर्णय हुडा यांनी जाहीर केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री चव्हाणांनीही हा निर्णय घेतला.
विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनाही आवाहन
काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनाही मोदींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. जास्त उत्साह न दाखवता आत्मसन्मान असेल तर मोदींच्या कार्यक्रमांपासून दूर रहा. पंतप्रधान आता झारखंडमध्ये जात आहेत. त्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी थोडे सावध राहिले पाहिजे, असे काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनी म्हटले आहे.

पुणे मेट्रो मागे पडल्याचेही दु:ख
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर रोष आहे. नागपूरचे मेट्रो मार्गी लावणे आणि पुण्याचे रखडविणे यामागे गडकरी असल्याचे चव्हाणांनी सुतोवाच केले. ज्या वदिर्भावर सातत्याने अन्याय होत गेला तेथील नागपूरमध्ये पुण्याच्या आधी मेट्रो येत असल्याचे शल्य मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे.

सांघिक भावनेला तडा
पंतप्रधानांच्या दोन कार्यक्रमांना मी गेलो होतो. या कार्यक्रमांत सांघिक भावनेला तडा गेल्याचे मला जाणवले. यापुढे असे होऊ नये म्हणून मी नागपूरच्या कार्यक्रमाला जाणार नाही.
-पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

हा रडीचा डाव!
मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा रडीचा डाव आहे. मोदींची वाढती लोकप्रियता पाहून त्यांच्या मनात ईर्षा नरि्माण झाली असावी. त्यांनी रडीचा डाव न खेळता कार्यक्रमाला जायला हवे.
- विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राजकीय स्वार्थासाठी हुल्लडबाजी
पंतप्रधानांचे कार्यक्रम भाजप पक्षाचे कार्यक्रम समजत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना हेतुत: अपमानित केले जात आहे. या घटनांमागे राजकीय स्वार्थ आहे. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडले .- शकील अहमद, काँग्रेस सरचिटणीस.
यामुळे काँग्रेस नाराज
* मंगळवारी हरियाणातील कैथलमध्ये मोदींच्या उपस्थितीत लोकांनी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह
हुड्डा यांचे भाषण हुल्लडबाजी करून बंद पाडले होते.
* १६ ऑगस्टला सोलापुरातही चव्हाण यांना मध्येच भाषण थांबवावे लागले होते. लोकांनी ‘मोदी..मोदी’ अशी घोषणाबाजी केली होती.

राजकीय कट
काँग्रेसचे मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच त्यांचे भाषण बंद पाडले जाते व मोदी उभे राहिले की त्यांचा मुद्दाम जयजयकार केला जातो. हा कट आहे, अशी काँग्रेसची तक्रार आहे.

राज्य विरूध्‍द केंद्र
देशाच्या संसदीय इतिसात मुख्यमंत्र्यांनी असा बहिष्कार टाकण्याची पहिलीच वेळ आहे. शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेला प्रथमच छेद दिला जात आहे. त्यामुळे राज्य विरूद्ध केंद्र संघर्ष तीव्र होण्याची चनि्हे आहेत.