आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Privat School Fees Of Poor Children Give Government

खासगी शाळांमध्ये शिकणा-या गरीब मुलांवरील खर्चाची जबाबदारी सरकार उचलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खासगी शाळांमध्ये शिकणा-या गरीब मुलांवरील खर्चाची जबाबदारी सरकार उचलणार आहे. त्यांच्यावरील शैक्षणिक खर्च, गणवेश, पुस्तके इत्यादी खर्चही सरकार स्वीकारणार आहे. त्यासाठी खासगी शिक्षण संस्थांनी गरीब मुलांवर केलेला खर्च परत देण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे.


मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आर्थिक समितीने या प्रस्तावावर मोहोर उमटवली. आता या प्रस्तावाला कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. तशी मंजुरी मिळाली तरी त्याची अंमलबजावणी एवढ्यात होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व दिल्लीसारख्या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल. वंचित वर्गातील मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याची तक्रार अनेक राज्यांतून येत होती. त्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरतो. प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 2016-17 पर्यंत सुमारे 20 हजार कोटी अतिरिक्त खर्च येणार आहे. एकूण खर्चात केंद्र व राज्याचा वाटा 65 : 35 असा असणार आहे.