आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफ एम रेडिओ बातम्या देत आहे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी नभोवाणीच्या एफएम वाहिन्यांसाठी खूशखबर आहे. लवकरच रेडिओ वाहिन्यांना बातमीपत्र देण्याची परवानगी मिळू शकेल. सरकारसमोर हा प्रस्ताव असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. एफएम रेडिओच्या प्रतिनिधींनी अलीकडेच माझी भेट घेतली होती. आमच्याकडून या प्रस्तावाला आक्षेप नाही.

प्रस्तावानुसार एफएम वाहिन्याही बातम्याही प्रसारित करू शकतील. प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी मंत्रालयाने एक पर्याय ठेवला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मार्फत बातम्या घेण्याचा हा पर्याय आहे.

अशी चर्चा झाली आहे. परंतु खासगी रेडिओ वाहिन्यांवर बातम्या असल्या पाहिजेत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे जावडेकर म्हणाले.दरम्यान, सरकारची आणखी 200 शहरात नवीन एफएम वाहिन्यांना मंजुरी देण्याची योजना आहे.

(डेमो पिक)