नवी दिल्ली - राष्ट्रीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावाई रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांच्या फेसबूक वॉलवर खासदारांविरोधात टीका करणारी पोस्ट केली. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात आज (गुरुवार) हक्कभंगाची नोटिस दिली आहे. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी ही नोटिस मंजूर केली तर वांड्रा यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे.
वाड्रा यांनी नेमकी काय टीका केली ?
रॉबर्ट वाड्रा यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले होते, ‘‘संसदेचे अधिवेशन सुरू होताच मुद्दे भटकवण्यासाठी त्यांचे (नेत्यांचे) राजकारण सुरू होते. भारतातील लोक मूर्ख नाही आहेत. पण, दु:ख याचे आहे की, भारताचे नेतृत्वच आता अशा लोकांकडे आहे. ''
आपल्या पोस्टवर लोकांनी केलेल्या कमेंट्सला उत्तर देताना वाड्रा यांनी म्हटले, ''लोकशाही व्यवस्था असलेल्या आपल्या देशात अशा प्रकारच्या राजकारणावर आपल्याला मात करावी लागणार आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. मी तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत माझ्यावरील खोटे आरोप बंद होत नाहीत.''
वाड्रा यांच्या पोस्टवर बीजेपीने काय प्रतिक्रिया दिली?
गुरुवार सकाळी लोकसभेत काम सुरू होताच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटले होते. दरम्यान, राजस्थानमधील बीजेपी खासदार अर्जुन राम मेघवाल म्हणाले, वाड्रा यांनी नेत्यांवर टीका करून संसदेचा अपमान केला आहे. मेघवाल यांनी दुपारी लोकसभाचे जनरल सेक्रेटरी यांना वाड्रा यांच्याविरोधात प्रिव्हीलेज नोटिससुद्धा पाठवली.
पुढे काय?
लोकसभेच्या नियमानुसार सभापतींनी ही नोटिस मान्य केली तर त्यावर चर्चा होते. त्यानंतर गरज वाटली तर संबंधित व्यक्तीला लोकसभेत बोलावले जाते.
पुढच्या स्लाइडवर पाहा संबंधित फोटो