आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शक्य झाल्यास आदिवासींची सेवा करणार : प्रियंका चोप्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मला राजकारणात जराही रस नाही, त्यासाठी जे गांभीर्य लागते ते आपल्याकडे नाही. अभिनय आणि राजकारण या दोन्ही भिन्न बाबी आहेत, परंतु शक्य असेल तेव्हा मी समाजसेवेसाठी पुढे येईन. आदिवासींची सेवा करायलाही मला आवडेल हे उदगार आहेत अभिनेत्री प्रियंका चोप्राचे!. तिने मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा केल्या. निमित्त होते मेरी कोम चित्रपटाचे!

प्रियंकाचा ‘मेरी कोम’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट करमुक्त व्हावा म्हणून तिने िदल्लीत गडकरींची भेट घेतली. प्रियंकाने गडकरींना पुष्पगुच्छ देत मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ‘मेरी कोम’साठी गेले सात महिने मी अथक परिश्रम घेतल्याचे प्रियंकाने गडकरींना सांगितले. या चित्रपटात मी एकही स्टंट केला नाही. अमेरिकेहून खास प्रशिक्षक बोलवून घेण्यात आला असल्याचे ती म्हणाली, तर गडकरी यांनी हा चित्रपट सहकुटुंब पाहीन असे आश्वासन दिले. गडकरी यांनी यावेळी तिच्या अभिनयाचे कौतुक करताना समाजाला प्रेरणा देणारे विषय निवडल्याबद्दल ितचे अभिनंदन केले.
राजकारण प्रवेश नाही, तो माझा प्रांत नव्हे!
गडकरींनीप्रियंकाला तू राजकारणात येण्यास इच्छुक आहेस का, असा प्रश्न केला तेव्हा तिला धक्काच बसला. तो माझा प्रांत नाही असे ितने लगोलग सांगून टाकले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे गुण लागतात ते माझ्यात नाहीत. मी अभिनयातच फिट आहे, परंतु मला समाजासाठी चांगले करावेसे वाटते. आदिवासींसाठीही काही करायचे आहे, असे तिने स्पष्ट केले.
िप्रयंका चोप्राने घेतली नितीन गडकरींची भेट