आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Denies Report On Fighting Polls Against Modi News In Divya Marathi

वाराणसीत लढण्यास कुणी रोखले नव्हते - प्रियंका गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणूक न लढवण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता. मला मनातून जोवर वाटत नाही तोवर मी हा निर्णय बदलणार नाही, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवण्यासंबंधी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे सोमवारी खंडन केले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात येथे निवडणूक लढवण्याची प्रियंका यांची इच्छा होती, असे वृत्त सोमवारी छापून आले होते.

मला निवडणूक लढवावी असे कधी वाटलेच तर माझा भाऊ, आई किंवा पती यांचा पाठिंबाच मिळेल. राहुलने अनेकदा निवडणूक लढवण्याचा आग्रह मला केला. परंतु माझी तशी इच्छाच नाही,’ असे प्रियंका यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसने हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचे म्हटले आहे.