आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी निवडणूक: प्रियंका गांधींकडे पक्षाचे प्रचारप्रमुख पद सोपवले जाण्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रियंका गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधींकडे मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी अटकळ बांधली जात असली तरी पक्षाने सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांनी आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी तासभर भेट घेतली. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत प्रियंका यांची काय भूमिका असेल यावर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे समजते. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील पक्षाचे प्रचार प्रमुख पद सोपवले जाईल, अशी शक्यता आहे. प्रियंका यांच्यावर कोणती जबाबादारी दिली जाईल यावर काँग्रेसने अजूनही चुप्पी साधली असली तरी त्यांच्याकडे प्रचार प्रमुख पद सोपवण्यात यावे, अशी मागणी अनेक नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याचे समजते. प्रियंका यांनी याआधी रायबरेली आणि अमेठी या लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळलेली आहे.
उत्तर प्रदेशात पक्षाची व्यूहरचना काय असावी यावर चर्चा करण्यासाठी गुलाम नबी आझाद यांनी याआधीही सोनिया आणि राहुल यांची अनेकदा भेट घेतली आहे. प्रियंका यांनी अधिक सक्रिय व्हावे आणि फक्त दोन लोकसभा मतदारसंघांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर प्रचार करावा, अशी आझाद यांची इच्छा आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाच्या व्यूहरचनेवर काम करत असलेले तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनीही तसेच मत व्यक्त केले आहे, असे समजते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पक्षात दोन मतप्रवाह ..
बातम्या आणखी आहेत...