आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका यांचा प्रचार केवळ अमेठी, रायबरेलीतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांनी मोठी जबाबदारी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, प्रियंका यांनी केवळ रायबरेली व अमेठीतच प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. रायबरेलीत त्यांची आई सोनिया गांधी व अमेठीत त्यांचे बंधू राहुल मैदानात आहेत. काही दिवसांपासून प्रियंका गांधी, या दोन मतदारसंघात सक्रिय आहेत. या दोन मतदारसंघापुरतेच र्मयादित न राहता त्यांनी व्यापार जबाबदारी स्वीकारण्याची मागणी, काँग्रेस नेते व कार्यकर्ते करत आहेत. लोधी स्टेटमध्ये मतदान केल्यावर त्या म्हणाल्या की, मी अमेठी व रायबरेलीतच राहील. त्यांच्या प्रचार कार्यातील सहभागाविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी असे उत्तर दिले.