नवी दिल्ली - प्रियंका गांधी यांचा जन्म 12 जानेवारी 1972 ला दिल्लीमध्ये झाला होता. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या संग्रहात पाहा त्यांची काही दुर्मिळ फोटो. प्रियंका यांनी सायकॉलॉजीमध्ये पदवी मिळवली. मुरादाबादचे बिझनेसमन रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले.
या कारणांमुळे होते इंदिरा गांधींसोबत प्रियंकांची तुलना....
प्रियंका गांधी आणि आजी इंदिरा यांच्यात अत्यंत जवळीक राहीली आहे. इंदिरा गांधीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रियंकावर दिसतो. प्रियंका यांची ड्रेसिंग स्टाइल, चालण्या- बोलण्यासह लोकांमध्ये वावरण्याची पद्धत ही इंदिरा गांधींसारखीच आहे. प्रियंका लहानपणी आजी आणि भाऊ राहुलसोबत खेळत होत्या. वडिल राजीव गांधींच्याही त्या अत्यंत जवळ होत्या.
राजकारणापासून दूर
गांधी घराण्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. मात्र प्रियंका गांधी या राजकारणात सक्रीय नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी माहिती दिली होती की, '1999 मध्येच मी निर्णय घेतला की, मला राजकारणात शिरायचे नाही.' मात्र, आई आणि भाऊ यांच्या निवडणूक प्रचारात त्या दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, प्रियंका गांधी यांचे काही खास फोटो...