आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Said Can\'t Pay Rs 53,000 To Rent 2,765 Sqm House

वाजपेयी सरकारने कमी केले प्रियंकांचे घरभाडे, पत्र लिहून केली होती विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका लोधी इस्टेटमधील प्रकार VI या सरकारी बंगल्यात राहतात. यासाठी प्रियांका आणि रॉबर्ट वद्रा महिन्याला 31, 300 रुपये भाडे भरतात. - Divya Marathi
प्रियांका लोधी इस्टेटमधील प्रकार VI या सरकारी बंगल्यात राहतात. यासाठी प्रियांका आणि रॉबर्ट वद्रा महिन्याला 31, 300 रुपये भाडे भरतात.
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वाड्रा या नव्या वादात अडकल्या आहेत. प्रियंकांनी १४ वर्षांपूर्वी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारला लुटियन्स झोन भागात २७६५.१७ चौरस मीटर जागेतील आपल्या बंगल्याचे भाडे कमी करण्याची विनंती केली होती. ५३,४२१ रुपयांचे भाडे भरणे माझ्या कुवतीबाहेरचे आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर सरकारने भाडे घटवून ८,८८८ रुपये केले होते.
नोएडाचे देवाशिष भट्टाचार्य यांनी आरटीआयअंतर्गत जुलै २००३ मधील कॅबिनेट कमिटी नोट मिळवल्या. त्यातूनही ही माहिती समोर अाली. त्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर प्रियंकांच्या कार्यालयाने शनिवारी स्पष्टीकरण दिले. त्यात म्हटले आहे की, ‘मी सरकारी बंगला मागितला नव्हता. १९९६ मध्ये एसपीजीने मला सुरक्षा प्रदान केली. त्याआधी मी एक खासगी घर घेतले होते. मात्र, तत्कालीन डीजी यांनी ते घर एसपीजी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले.
पुढे वाचा... कसा झाला खुलासा...