आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीत IIT का नाही? प्रियंका गांधींचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैबतपूर खुर्द गावी महिलांच्या समस्या जाणून घेताना प्रियंका गांधी - Divya Marathi
हैबतपूर खुर्द गावी महिलांच्या समस्या जाणून घेताना प्रियंका गांधी
रायबरेली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी - वढेरा बुधवारपासून दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर आहेत. हा सोनिया गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. प्रियंका यांनी रायबरेलीमध्ये येताच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. मंगळवारी अमेठी दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी स्वतःला अमेठीची कन्या म्हटले होते. त्याचा समाचार घेत प्रियंका म्हणाल्या, 'स्मृति यांनी स्वतःला अमेठीची मुलगी म्हटले आहे. मग त्यांनी सांगितले पाहिजे, की येथे अजून आयआयटी का सुरु झाले नाही ? जर त्या रायबरेली आणि अमेठीच्या शुभचिंतक आहेत तर त्यांनी अमेठीत आयआयटी सुरु करावे यामुळे येथील तरुणांचा मोठा फायदा होईल.' यावेळी फुडपार्क बद्दल मात्र त्यांनी सोईस्कर मौन बाळगले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, या बद्दल माझे भाऊ तुम्हाला अधिक चांगली माहिती देऊ शकतात.
झोपडीत जाऊन जाणून घेतल्या समस्या
रायबरेलीमध्ये प्रियंका यांनी सर्वप्रथम चंद्रीमंडिकाखेडा या गावी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर हैबतपूर खुर्द या गावी गेल्या. तिथे एका झोपडीत जाऊन त्यांनी तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. राजकुमार माली यांच्या झोपडीत प्रियंकांसोबत बोलण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यात एक अजीबाई पडल्या. त्यांना प्रियंकानी सहारा देऊन उठवून बसवले आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकले. प्रियंका म्हणाल्या, तुमच्या गावाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच मी येथे येण्याचे ठरवले होते.
प्रियंकाच्या ताफ्याला धडकला होता बाइकस्वार
प्रियंका गांधी - वढेरा यांचा ताफा रायबरेलीकडे निघाला असताना उन्नाव येथे त्यांच्या ताफ्यातील कारला एक युवक धडकला. मात्र त्याला फार मार लागला नाही. सुरक्षा रक्षकांनी त्याला लागलीच उचलले आणि ताफा पुढे रवाना झाला.

पुढील स्लाइडमध्ये, प्रियंका यांनी गावात फिरून जाणून घेतल्या समस्या