आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेसच्या वॉर रुमचा ताबा, अनेक दिग्गजांना केले बाजूला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा निवडणूक प्रचार आणि रणनीती ठरविण्यासाठी प्रियंका गांधी पुढे सरसावल्या आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 12, तुघलक रोड येथील निवासस्थानी काँग्रेसची वॉर रुम तयार करण्यात आली आहे. येथे त्यांचा राबता वाढला आहे. प्रियंका यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बाजूला सारत एक प्रकारे वॉर रुमचा ताबा घेतला आहे.
काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे, की प्रियंका केवळ येथे हजेरीच लावत नाहीत तर, पक्षाच्या नियमीत बैठकांमध्ये त्यांची उपस्थितीती असते. एवढेच नाही, तर योजनांवर शेवटचा हात फिरविताना त्यांचा सल्ला महत्त्वपूर्ण असतो. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत उपाध्यक्षांची बैठक होती, त्या बैठकीला प्रियंका देखील उपस्थित होत्या.
पक्षात नवा जोश
आतापर्यंत प्रियंका या कुटुंबातील सदस्यांच्या मतदारसंघात काम करताना दिसल्या आहेत. अमेठी, रायबरेली आणि सुल्तानपूर येथे त्या पक्षाचे काम करताना आणि निवडणूक प्रचार सक्रिय सहभागी झालेल्या दिसल्या आहेत. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे, की प्रियंका यांनी वॉर रुमची जबाबदारी सांभाळल्यापासून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. काँग्रेसचे जुने जाणते नेते आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यातील ताय महत्त्वाची कडी ठरत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, महत्त्वाचे निर्णयात प्रियंकांचा सहभाग