आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियरंजन दासमुन्शी यांनी \'फॅशन\' टीव्हीवर घातली होती बंदी; पत्नीला मानायचे सर्वात मोठा मित्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. ते 9 वर्षांपासून कोमात होते. यूपीए 1 सरकारमध्ये ते मंत्री होते. मृत्युसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप आहेत. 2004 मध्ये बंगालच्या रायगंज मतदारसंघातून लोकसभेत ते अखेरचे निवडून गेले होते. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.


9 वर्षांपासून अपोलो रुग्णालयात होते दासमुन्शी
- दासमुन्शी प. बंगालमधून काँग्रेसचे लोकसभा खासदार होते. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला होता. यानंतर दासमुन्शी बोलू शकत नव्हते. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ठेवण्यात आले होते. यूपीए सरकार असताना ते इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मंत्री होते.
- पॅरालिसिसनंतर त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाला होता. तथापि, शरीराच्या इतर भागाला जास्त नुकसान झाले नव्हते. तथापि, मेंदूच शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण करतो, यामुळै दासमुन्शी 9 वर्षे बेडवरच होते. श्वास घेण्यासाठी त्यांच्या गळ्यात एक ट्यूब (tracheostomy) टाकण्यात आली होती. याशिवाय पोटात एक नळी टाकण्यात आली होती. याद्वारे दासमुन्शी यांना लिक्विड डाएट देण्यात येत होती. त्यांना जवळचे व्यक्तीही ओळखू येत नव्हते.
- 2014 मध्ये एनडीए सत्तेत आल्यावर केंद्राने म्हटले होते की, सरकार दासमुन्शी यांच्या उपचारांचा खर्च उचलणे सुरूच ठेवणार आहे. दासमुन्शी यांच्या पत्नीही काँग्रेसमध्ये आहेत.

 

राजकीय प्रवास
13 नोव्हेंबर 1945 रोजी जन्मलेले प्रियरंजन दासमुन्शी 25 वर्षे वयातच 1970 मध्ये प. बंगाल यूथ काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. दुसऱ्या वर्षी 1971 मध्ये ते दक्षिण कोलकाता मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत गेले. यानंतर त्यांनी 1984 मध्ये हावडा लोकसभा सीट जिंकली. 1985 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय मंत्री बनले. दासमुन्शी यांना निवडणुकांमध्ये पराभवही पत्करावा लागला. त्यांना दोन वेळा 1989 आणि 1991 मध्ये हावडा सीट गमवावी लागली. परंतु, सलग दोन वेळा 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी रायगंज मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला. दासमुन्शी यांना खेळांचीही आवडत होती. ते 20 वर्षांपर्यंत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही राहिले.

 

वादग्रस्त निर्णय...
- 2004 मध्ये मनमोहनसिंग सरकारमध्ये दासमुन्शी सूचना प्रसारण मंत्री तसेच संसदीय कार्य मंत्रीही होते. सूचना प्रसारण मंत्री म्हणून ते चर्चेत राहिले. त्यांनी AXN आणि फॅशन टीव्हीवर बंदी घातली होती, तसेच खेळांच्या प्रसारणाचे अधिकार दूरदर्शनला दिले होते. एवढेच नाही, त्यांना माध्यमांवरही नियंत्रण आणायचे होते, यासंबंधी कायदा आणण्याच्या तयारीत होते. परंतु यानंतर ते आजारी पडले. आपल्या या निर्णयांमुळे त्यांना टीकेचाही सामना करावा लागला होता.


कौटुंबिक आयुष्य
प्रियरंजन दासमुन्शी यांनी दीर्घकाळच्या मैत्रीनंतर कोलकात्याच्या समासेविका दीपा दासमुन्शी यांच्याशी 1994 मध्ये विवाह केला होता. दोघांना एक मुलगा प्रियदीप दासमुन्शी आहे. एकदा बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "मित्र तर माझे अनेक आहेत, परंतु सर्वात मोठी फ्रेंड माझी पत्नी आहे. प्रदीर्घ मैत्रीनंतर आमचे लग्न झाले. परंतु, मित्र तर आणखी खूप आहेत. मैत्रीच्या बाबतीत मी पक्षाचा विचार करत नाही."

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...