आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात या प्रॉडक्ट्‍सवर बंदी, मात्र भारतीय बाजारात होत आहे खुलेआम विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये हानिकारक शिसे आणि मोनोसोडियम ग्लूटामेट (एमएसजी) अतिप्रमाणात आढळले. त्यामुळे भारतासह अनेक देशात मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मॅगीप्रमाणेच देशभरात अनेक प्रॉडक्ट्‍स असे आहेत की, जगभरात त्यांच्यावर बंदी आहे. परंतु, भारतीय बाजारात हेच प्रॉडक्ट्‍स खुलेआम विकले जात आहेत.
'मॅगी' प्रकरण उघडकीस आल्यामुळे आपले सरकार देशातील जनतेच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे, हे स्पष्‍ट झाले आहे.

'किंडर जॉय'वर 2500 डॉलर्सचा दंड
'किंडर जॉय' किंवा 'किंडर सरप्राइज एग'वर अमेरिकन सरकारने बंदी घातली आहे. अमेरिकेत 'किंडर जॉंय' चॉकलेट खरेदी केल्यास 2,500 डॉलर्सचा दंड वसूल केला जातो. या चॉकलेटमध्ये 'सरप्राइज टॉय' असल्यामुळे अमेरिकन सरकारने यावर बंदी घातली आहे. परंतु, भारतीय बाजारात किंडर जॉय चॉकलेट खुलेआम विकले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जगभरात बंदी परंतु भारतीय बाजारात विकले जातात खुलेआम!