आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Protecting Your Data, Intellectual Property, And Brand From Cyber Attacks"

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेटवरील गोपनीयतेबाबत भारतीय युजर्स निष्काळजीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोपनीयता सूचकांकात भारतीय युजर्सची गोपनीयता सर्वात जास्त धोक्यात आहे. ईएमसी इंडियातर्फे जारी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार 61 टक्के भारतीय युजर इंटरनेटवर काम करताना आपल्या गोपनीयतेला जास्त महत्त्व देत नाहीत.
बदलत्या काळानुसार भारतात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे भारतीय युजर्सची पोहोच परदेशांपर्यंत पसरली आहे. पण आपल्या देशात इंटरनेट गोपनीयतेबाबत बेफिकिरीचे वातावरण सर्वाधिक आहे, हीसुद्धा एक बाजू आहे. ऑनलाइन गोपनीयतेवर आधारित या जागतिक सर्वेक्षणात 15 देशांतील 15 हजार युजर्सचा समावेश करण्यात आला होता, पण सर्वेक्षणातून मिळालेले निकाल भारतीयांना आश्चर्यचकित करणारे आहेत. या अहवालानुसार 77 टक्के भारतीय युजर्स पासवर्ड अथवा आपली खासगी माहिती शेअर करताना संबंधित संकेतस्थळ आणि त्याच्या धोरणावर सहजपणे विश्वास ठेवतात.

गोपनीयता घटण्याचे कारण
ईएमसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष (भारत आणि सार्क) राजेश जाने यांनी सांगितले की, इंटरनेट युजर्सना सुविधांच्या नावावर सर्व काही हवे असते. त्यासाठी ते आपली गोपनीयता पणाला लावतात. 61 टक्के भारतीय युजर आपली गोपनीयता पणाला लावण्यास तयार असतात. 43 % पुरुष युजर्सच्या तुलनेत 59 % महिला युजर्स गोपनीयतेला महत्त्व देतात. त्या आपली माहिती परस्परांना देत नाहीत.

अशी राखा गोपनीयता
- वेगवेगळ्या अकाउंटसाठी एकाच पासवर्डचा वापर टाळा. पासवर्ड नियमितपणे बदला.
- पर्याय असेल तेथे ईमेल अथवा ऑनलाइन अकाउंटसाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.
- कंपनीतर्फे दिलेल्या नेटवर्कचा वापर खासगी कामासाठी करू नये.
- प्रत्येक ठिकाणी वायफाय कनेक्शनवर विश्वास ठेवू नये.
- अनोळखी संकेतस्थळावर आपली माहिती देऊ नका.

माहिती असूनही बेफिकिरी : 64 % भारतीय युजर्सनी पासवर्ड हॅक होणे ते डाटा चोरी होण्याच्या समस्येचा सामना केला आहे, पण त्यांनी काहीच केले नाही.41 % भारतीय नियमितपणे पासवर्ड बदलत नाहीत. 28 % पासवर्डशिवायच मोबाइलचा वापर करतात. 21 % गोपनीयता धोरणच वाचत नाहीत. गोपनीयता घटली, असे 51 % लोक मान्य करतात.