आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'अडवानींजी तुम्ही आता म्हातारे झालात, देशहितासाठी मोदींना पाठिंबा द्या'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्‍ण अडवानी यांच्या घरी गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींचे समर्थक निदर्शने करीत आहेत. या लोकांच्या हातात हिंदू सेनेचे पोस्‍टर आणि बॅनर आहेत. त्यांनी अडवानींच्या विरोधात घोषणाबाजी व मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सुमारे 40 लोक अडवानींच्या घरासमोर घोषणा देत असून, मोदींना पीएम पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी करीत आहेत. या लोकांनी 'नरेंद्र मोदी आर्मी' असे लिहलेले बॅनर हातात घेतले आहेत. लोक निदर्शने करीत अडवानींचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असून अडवानींना भेट देऊ इच्छित आहेत.

प्रदर्शन करणा-या लोकांनी घरासमोर नारेबाजी करीत, अडवानींजी आता तु्म्ही म्हातारे झाले आहात. राष्ट्रहितासाठी आता मोदींना पाठिंबा द्या असे आवाहन केले. मोदींचा मार्ग मोकळा करायला हवा, असे निदर्शने करणा-यामध्ये सामील झालेल्या एका साधूचे म्हणणे आहे. तो साधू म्हणाला की, अडवानींचे आपण चेला असून, अडवानींनी आता राष्‍ट्रहितासाठी मोदींचे समर्थन केले पाहिजे.

पुढे पाहा, अडवानींच्या घरासमोर निदर्शने करणा-यांची छायाचित्रे...